शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सनराइजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन का आहे चर्चेत? सर्वात जबरदस्त टिमची श्रीमंत मालकीण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 14:49 IST

1 / 8
सध्या सगळीकडे आयपीलची हवा आहे. फक्त खेळाडूच नाही तर सगळ्या संघांचे मालकसुद्धा फार चर्चेत आहेत. मग संघ कोणताही असो आयपीलची धुंदी प्रेक्षकांवर फार जास्त चढलेली दिसते आहे.
2 / 8
सनराईझरर्स हैदराबाद म्हणजेच एसआरएच हा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी एक संघ आहे. एसआरएचचा सामना चालू असताना संघाची सीईओ फार उत्साहात संघाला प्रोत्साहन देताना दिसते.
3 / 8
काव्याचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ ला चेन्नई या ठिकाणी झाला. तिच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मोठा उद्योगपती आहे.
4 / 8
काव्या मारन ही एका उद्योगपती घराण्यातील महिला आहे. ती कलनिधी मारन यांची मुलगी आहे. उद्योग क्षेत्रातील मारन परिवार फार मोठे नाव आहे.
5 / 8
काव्या मारन ही एक उत्तम बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाते. चेन्नईच्या स्टेला मारिस कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने अमेरिकेतून एमबीए केले आहे.
6 / 8
संघासाठी निर्णय घेणे, गुंतवणूक करणे, पब्लिसीटी करणे इतरही कामे ती करते. इतरही अनेक काम काव्या मारनच्या आदेशानेच घडतात.
7 / 8
काव्याचे वडील तर श्रीमंत आहेतच मात्र काव्याकडे ४०९ करोड एवढी नेट वर्थ आहे. तिची संघातील ओनरशीप मात्र गुप्तच ठेवण्यात आली आहे.
8 / 8
सध्या आयपीएलमध्ये काव्याची चर्चा जोरदार आहे. काव्या दिसायलाही फार सुंदर आहे. तसेच संघातील खेळाडूंबरोबर तिचे नातेही खेळीमेळीचे आहे.
टॅग्स :IPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५IPLआयपीएल २०२४Sunrisers Hyderabadसनरायझर्स हैदराबादWomenमहिला