शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तो पंजाबी, ती तेलगू-प्रेमात पडले आणि..सोनू आणि सोनाली सूदची लव्हस्टोरी! एक दूजे के लिए...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 14:54 IST

1 / 8
प्रसिद्ध अभिनेता आणि (Who is Sonu Sood Wife) सामाजिक कार्यकर्ता (Sonu Sood) सोनू सूद याची पत्नी (Sonali Sood) सोनाली सूद (Who Is Sonu Soods Wife Sonali Sood Car Accident In Mumbai Nagpur Highway) हिचा सोमवारी, २५ मार्च २०२५ रोजी समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता.
2 / 8
कार अपघातात सोनाली आणि तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या (Actor Sonu Sood's wife Sonali injured in car crash) तिच्या बहिणीच्या मुलाला दुखापत झाली आहे. सध्या दोघांवरही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3 / 8
सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते आणि फारशा माध्यमांमध्येही ती दिसत नाही. यासाठीच, सोनू सूदची पत्नी म्हणजे नेमकी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
4 / 8
सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा जन्म नागपूरमध्ये झाला आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची असून तिने नागपूर विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. ती व्यवसायाने चित्रपट निर्माती आणि गृहिणी आहे.
5 / 8
सोनू सूद इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना सोनालीच्या प्रेमात पडला त्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करु लागले, त्यानंतर १९९६ साली दोघेही विवाहबद्ध झाले.
6 / 8
सोनू आणि सोनाली सूद यांना दोन मुलगे आहेत. अयान आणि इशांत अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.
7 / 8
सोनू पंजाबी आहे तर सोनाली तेलगू आहे. सोनाली माझ्या आयुष्यात येणारी पहिली आणि अखेरची मुलगी आहे, असे तो अनेक मुलाखतींमध्ये सांगतो.
8 / 8
सोनूच्या संघर्षाच्या काळात सोनाली नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSonu Soodसोनू सूदLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट