शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गडबडीत भाजीमध्ये खूपच तेल घातलं? तवंग काढून भाजीतलं तेल कमी करण्यासाठी २ खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 09:20 IST

1 / 5
कधी कधी गडबडीत स्वयंपाक करताना आपलं थोडं दुर्लक्ष होतं आणि भाजीमध्ये जरा जास्त तेल घातलं जातं.
2 / 5
आता जास्त तेल खाणं आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे कमीतकमी तेल खाण्याकडे आता बहुतांश लोकांचा कल असतो.
3 / 5
भाजीमध्ये जर तेल जास्त झालं तर त्याचा तवंग लगेच भाजीवर दिसू लागतो. हे तेल पळीमध्ये घेऊन काढताना ग्रेव्हीही वाया जाते.
4 / 5
म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करा. भाजीतलं तेल कमी होईल. हा उपाय करण्यासाठी एका खोलगट पळीमध्ये आईस क्यूब घ्याआणि ती पळी भाजीमध्ये अलगद बुडवा. पळी थंडगार झाल्याने तिच्या तळाला भाजीतलं जास्तीचं बटर, तेल चिटकून बसेल.
5 / 5
पेपट नॅपकिनचे एक टोक भाजीमधल्या तेलात अलगद बुडवा. जास्तीचं तेल पेपर नॅपकिन शोषून घेईल.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स