शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

थंडीत चेहरा काळा पडला? व्हिटामीन ई कॅप्सूलचा जादूई उपाय; चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 21:42 IST

1 / 7
व्हिटामीन ई तेल कॅप्सूल चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. या तेलामध्ये शक्तीशाली एंटी ऑक्सिडेंट्स असतात.
2 / 7
व्हिटामीन ई एक उत्कृष्ट इमोलिएंट आहे जो त्वचेला खोलवर हायड्रेट करतो आणि मऊ बनवतो. कोरड्या त्वचेसाठी हे फायदेशीर ठरते.
3 / 7
हे त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात आणि त्वचेचं संरक्षण करतात.
4 / 7
हे तेल त्वचेला रिपेअर करण्यास मदत करते. ज्यामुळे मुरूमांचे डाग आणि इतर व्रण हळूहळू हलके होऊ शकतात.
5 / 7
सुर्यप्रकाशामुळे त्वचेला झालेल्या नुकसानीवर सनबर्नवर व्हिटामीन ई तेल लावल्यास त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते.
6 / 7
डोळ्यांखालच्या त्वचेला पोषण मिळाल्यानं याचा काळजीपूर्वक वापर केल्यास काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होऊ शकते.
7 / 7
व्हिटामीन ई तेल खूपच जाड असते त्यामुळे ते थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी बदाम तेल, नारळ तेल किंवा तुमच्या सामान्य मॉईश्चरायझरमध्ये मिसळून मग ते चेहऱ्यावर लावा.ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी हे तेल थेट लावल्यास मुरूम वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे जपून वापरा.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी