1 / 9वटपौर्णिमेचा सण अगदीच उद्यावर (Vatpournima 2025) आला आहे. आतापर्यंत अनेकींची वटपौर्णिमेच्या पूजेची सगळी तयारी एव्हाना झाली असेलच. परंतु कोणताही भारतीय सण हा रांगोळी शिवाय अधूराच आहे( VatPurnima Rangoli Designs).2 / 9वटपौर्णिमेला देखील आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी वडाच्या झाडाभोवती (Vat Purnima Rangoli Designs Simple Rangoli Designs) रांगोळी काढून सजावट करतो. यासाठीच, वटपौर्णिमेनिमित्त काढता येतील अशा सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूयात. 3 / 9वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते, यामुळे प्रामुख्याने या सणाचे महत्व ओळखून आपण वडाचे झाड रांगोळीत असेल अशा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढू शकतो. 4 / 9वटपौर्णिमेला स्त्रिया पारंपरिक वेशभूषा आणि दागिने घालून, अगदी नटून - थटून वडाची पूजा करतात. त्यामुळे आपण रांगोळीत मंगळसूत्र, नथ असे सौंभाग्यलंकार काढून रांगोळी अधिक सुंदर करु शकतो. 5 / 9वटपौर्णिमेला सवाष्ण महिला एकमेकींना वाण म्हणून हळदी कुंकू, फळे देतात त्यामुळे या वाणाचा रांगोळीत असा वापर करता येऊ शकतो.6 / 9अखंड सौभाग्यासाठी महिला ही वटपौर्णिमेची पूजा करतात, अशावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सौभाग्याचा संदेश देखील रांगोळीत लिहू शकतो. 7 / 9वटपौर्णिमेला हिरवा चुडा, तांदूळ, गहू, यांसारख्या अनेक वस्तूंचे विशेष असे महत्व असते. आपण हिरव्या चुड्याच्या मदतीने देखील अशी सुंदर रांगोळी काढून सजवू शकतो. 8 / 9 याचप्रमाणे आपण वडाच्या झाडाच्या पूजेसाठी थाळी तयार करतो, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर करून देखील आपण अशी नेहमीपेक्षा वेगळी पण रेखीव अशी रांगोळी काढू शकतो. 9 / 9वटपौर्णिमेला फक्त रांगोळीच नाही तर रांगोळी भोवती दिव्यांची आरास केल्याने देखील रांगोळी अधिक खुलून दिसेल.