मंगळसुत्राच्या २ वाट्या सासर माहेरची खूण! नववधूसाठी छोटं वाटी मंगळसूत्र; १० युनिक पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:55 IST
1 / 10लग्न म्हटलं की मंगळसुत्राची खरेदी आलीच बरेचजण मोठ्या मंगळसुत्रासोबतच लहान मंगळसुत्रसुद्धा बनवून घेतात.छोट्या मंगळसुत्राचे काही युनिक, नवीन पॅटर्न्स पाहूयात.(Short Vati Mangalsutra Designs)2 / 10लहान मंगळसुत्रात कितीही नवीन पॅटर्न आले तरी वाट्यांचं मंगळसुत्र एव्हरग्रीन आहे. संस्कृती जपणारं वाट्यांचं मंगळसुत्र आजही मुलींना तितकंच आवडतं. (Vati Mangalsutra For Newly Married)3 / 10छोट्या मंगळसुत्रात तुम्हाला एकापेक्षा एक नवीन डिझाईन्सस मिळतील त्यासोबतच अगदी कमी ग्रॅममध्ये मिनिमलिस्टिक डिझाइन्सही उपलब्ध होतील. (Vati Mangalsutra Designs)4 / 10वाट्यांमध्येही बरेच प्रकार असतात तुम्हाला आवडेल तो पॅटर्न तुम्ही निवडू शकता. हे पॅटर्न ऑफिसवेअरसाठीही सुंदर दिसेल.5 / 10सध्या नववधूंमध्ये छोटे आणि नाजूक डिझाईन्स असलेले मंगळसूत्र खूपच लोकप्रिय आहेत.6 / 10सोन्याच्या वाट्या मंगळसुत्राचा अत्यावश्यक भाग आहेत. पारंपारीक दोन वाट्या ज्या सासर-माहेरची खूण म्हणून ओळखल्या जातात.7 / 10छोटे मंगळसुत्र ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी आरामदायक असतात आणि ते वेस्टर्न तसंच भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांवर शोभून दिसतात.8 / 10मंगळसूत्राची डिझाईन निवडताना वधूची आवड आणि तिच्या व्यक्तीमत्वाला साजेसा नमुना निवडा.9 / 10सिंपल गोल वाट्या न निवडता तुम्ही अशा डिझाईन्स घेऊ शकता ज्या फॅन्सी लूक देतील.10 / 10वाट्यांच्या खाली काळ्या मण्यांचे लटकन असतील तर या डिझाईन्ससुद्धा उत्तम दिसतात.