1 / 8काही आजार हे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. कधी कोणता त्रास होईल याची काही खात्री देता येत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात मात्र काळजी घेणे तर नक्कीच आपल्या हातात असते. त्यामुळे महिलांनी कायम आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. 2 / 8काही आजार महिलांना पटकन होतात. पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण कमी आहे. पाहा असे कोणते त्रास आहेत ज्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला वेळीच काळजी घ्यायला हवी. 3 / 8महिलांची हाडे लवकर ठिसूळ होतात हे तर आपल्याला माहिती आहे. त्यासाठी विविध पदार्थ खाणे, औषधे घेणे, व्यायाम करणे फार गरजेचे असते. हाडांची झीज फार कॉमन समस्या आहे. तसेच हाडांचा कॅन्सर महिलांमध्ये जास्त आढळून येतो. पुरुषांमध्ये प्रमाण ६.३ टक्के आहे तर महिलांमध्ये २१.२ टक्के. 4 / 8ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण फार भयानक आहे. अनेक महिला या त्रासातून जातात. उपचार भरपूर आहे. आजारातून मुक्तताही होऊ शकते. मात्र योग्य वेळी निदान केले तर. त्यामुळे महिलांना वेळोवेळी तपासणी करायला हवी. हा आजार कोणत्याही महिलेला होऊ शकतो. 5 / 8मायग्रेन असल्यावर डोकं प्रचंड दुखतं. डोकेदुखी असह्य होते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण तिप्पट आहे. कारणे अनेक असतात. तुमचे सतत डोके दुखत असेल तर वेळीच काळजी घ्या. डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या. काळजी घेणे कधीही चांगले.6 / 8पुरुषांच्या तुलनेत थायरॉईडच्या त्रासाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असते. जास्त सक्रिय थायरॉइड महिलांमध्ये आढळतात. त्यामुळे खुप त्रास होऊ शकतो. महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 7 / 8युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि मूत्राशयासंबंधीत समस्या महिलांमध्ये अॅनॅटॉमिक संरचनेमुळे वारंवार आढळतात. त्यावर उपाय आहेत. वेळीच करायचे म्हणजे त्रास कमी होतो. सार्वजनिक शौचालयाचा जास्त वापर करु नका. 8 / 8सांधेदुखी हा अगदी साधा वाटणारा प्रकार पुढे जाऊन फार त्रासदायक ठरु शकतो. तसेच ऑस्टियोआर्थरायटिस महिलांमध्ये तीन पट जास्त आढळतो. आहार चांगला घेणे, व्यायाम करणे हे उपाय आत्ताच सगळ्यांनी सुरु करा.