1 / 8बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या स्वत:च्या लग्नात लेहेंगा घालणारच असं आपल्याला वाटतं. आजवर आपण अशाच रुपात अनेक बॉलीवूड अभिनेत्री पाहात आलो आहोत. पण काही जणी मात्र याला अपवाद ठरल्या आहेत.2 / 8नुकतंच तापसी पन्नूचं लग्न झालं. या लग्नाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून लग्नासाठी तापसीने सलवार- सूटची निवड केली होती. सलवार सूट आणि गॉगल अशा एकदम हटके स्टाईलमध्ये ती दिसून आली.3 / 8आलिया भटचा तिच्या लग्नातला लूकही खूप गाजला होता. तिने तिच्या लग्नासाठी मोतिया रंगाच्या कोणतंही हेवी डिझाईन नसणाऱ्या सुंदर साडीची निवड केली होती.4 / 8करिना कपूरने तिच्या लग्नात शरारा आणि त्यावर लाँग कुर्ता अशा पद्धतीचे कपडे घातले होते.5 / 8अजय देवगण आणि काजोलचं लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं होतं. त्यामुळे काजोलने लग्नात ९ वार साडी नेसली होती.6 / 8ऐश्वर्या रायनेही तिच्या लग्नात लेहेंगा घातला नव्हता. त्याऐवजी तिने कांजीवरम साडी नेसण्यास प्राधान्य दिले होते. तिची ती साडी डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाईन केली होती आणि तिच्या साडीला स्वरोस्कीचे हिरे जडवलेले होते.7 / 8जेनेलिया डिसुझा हिने तिच्या लग्नात भरगच्च डिझाईन असणारी लाल साडी नेसली होती. 8 / 8शिल्पा शेट्टीनेही लेहेंग्याऐवजी साडी नेसण्यालाच प्राधान्य दिले होते.