शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टायलिश लूक देणारे लेटेस्ट फॅशनचे लांब बाह्यांचे ब्लाऊज, ७ सुंदर डिझाईन्स- ट्राय करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2024 3:19 PM

1 / 8
स्लिव्हलेस, छोट्या बाह्यांचे, कोपऱ्यापर्यंत बाह्या असणारे ब्लाऊज नेहमीच असतात. आता असे पूर्ण बाह्यांचे ब्लाऊज घालून पाहा. हिवाळ्यात तर असे लांब बाह्यांचे ब्लाऊज खूप ट्रेण्डी असतात.
2 / 8
ब्लाऊजची ही एक फॅशन पाहा. कोपऱ्यापर्यंत पूर्ण घट्ट बाह्या आणि त्याच्याखाली नाजूक झालर. अशा पद्धतीचं ब्लाऊजही अतिशय आकर्षक लूक देतं.
3 / 8
प्लेन साडी असेल तर अशा पद्धतीचं एखादं एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज घालून पाहा.
4 / 8
काठपदराच्या साडीवर असं ब्रासो कपड्याचं पूर्ण बाह्यांचे ब्लाऊजही छान दिसतं. यासाठी साडी मात्र खूप हेवी वर्कची नसावी.
5 / 8
एखादी साधीच शिफॉन साडी असेल, पण त्यावरचं ब्लाऊज मात्र असं थोडं स्टायलिश शिवलं तर तुमचा लूक नक्कीच बदलू शकतो.
6 / 8
असं एखादं डिझायनर ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असावं. काळं, लाल, गुलाबी, हिरवं असं ब्लाऊज घ्या, म्हणजे ते बऱ्याचशा साड्यांवर चालेल.
7 / 8
सेक्विन वर्कची फॅशन सध्या खूप आहे. त्यामुळे असं एखादं ब्लाऊज घ्या. डिझायनर साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान लूक देईल.
8 / 8
अशा पद्धतीचे ब्लाऊज काठपदर साडी आणि डिझायनर साडी या दोन्हींवरही छान दिसतात.
टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सsaree drapingसाडी नेसणे