1 / 9बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असो किंवा एखादी सर्वसामान्य महिला असो, आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करणं हा बहुसंख्य महिलांचा नैसर्गिक स्वभाव असतोच..2 / 9आता सौंदर्य खुलविण्यासाठी आपल्याकडे कित्येक घरगुती उपाय आहेत जे आपल्या आजी, आई यांच्याकडून आपल्याला कळालेले असतात.. असाच एक खास पारंपरिक उपाय सोहा अली खानही करते आणि तिने तोच उपाय सोशल मिडियावर शेअर केला आहे.3 / 9हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ घ्या. बेसन पीठ हे एक नॅचरल स्क्रबर म्हणून ओळखलं जातं. त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.4 / 9आता या पिठामध्येच चिमूटभर हळद घाला. हळद भाजून घातली तर ते अधिक उत्तम.5 / 9आता त्यामध्ये थोडा मध घालावा. मधामुळे त्वचा छान हायड्रेटेड राहण्यास मदत होते. पण ज्यांना ॲक्नेचा त्रास आहे, त्यांनी मध घालणं टाळावं.6 / 9यानंतर या पिठामध्ये थोडी चंदन पावडर घाला. चंदन त्वचेला थंडावा देऊन तजेलदार ठेवते. ज्यांना पिंपल्सचा खूप त्रास असतो, त्यांच्यासाठीही चंदन उपयुक्त ठरते.7 / 9आता सगळ्यात शेवटी या पिठामध्ये थोडे दही आणि थोडे गुलाब जल घालावे.8 / 9सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित कालवून घ्या आणि हा लेप चेहऱ्याला लावा. यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 9 / 9चेहऱ्यावर छान चमक येईल. त्वचा मऊ, मुलायम झाल्यासारखी जाणवेल.