शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संकष्टी चतुर्थी स्पेशल : कामाच्या घाईगडबडीत मोदक करायला वेळ नाही ? संकष्टी चतुर्थीला इन्स्टंट करता येतील असे ६ गोड पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 14:15 IST

1 / 8
गणपती बाप्पा हे आपल्यापैकी बऱ्याचजणांचे आराध्यदैवत. महिन्यातून एकदा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi Special Sweet Dish Recipe) उपवास आपल्यापैकी बहुतेकजण आवर्जून करतात. बाप्पाला मोदक आवडतात म्हणून चतुर्थीचा नैवेद्य म्हणून बहुतांशवेळा उकडीचे किंवा तळणीचे मोदक केले जातात.
2 / 8
पण आठवड्याचा दिवस असेल आणि आपल्याला (Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe) ऑफीस आणि इतर कामं असतील तर मोदक करायला वेळ होतोच असे नाही. अशावेळी चंद्रोदयाला बाप्पांची आरती करुन त्यांना झटपट पण चविष्ट नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असे सोपे गोडाचे पदार्थ कोणते करता येतील याचे काही सोपे पर्याय पाहूयात.
3 / 8
करायला अतिशय सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही सोपी रेसिपी आहे. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण तांदुळाची खीर नक्की करु शकतो. यासाठी तांदूळ भाजून घेऊन मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करुन घ्यायचे. तूपावर तांदूळ आणि ओलं खोबरं चांगले परतून घेऊन त्यामध्ये साखर आणि दूध घालून हे सगळे चांगले शिजवून घ्यायचे. सुकामेवा, खवा, केशर, वेलची पूड यांसारख्या गोष्टी घालून आपण या खिरीचा स्वाद वाढवू शकतो.
4 / 8
मूगाची डाळ आपल्या घरात असतेच. ही डाळ भाजून मिक्सरमधून काढायची आणि भरपूर तूप घालून चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालून हे सगळे तूपावर चांगले परतून घ्यायचे. यामध्ये सुकामेवा, केशर घातल्यास या हलव्याचा स्वाद वाढण्यास मदत होते.
5 / 8
तूपावर गाजराचा किस परतून त्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा आणि साखर घालून सगळे चांगले एकजूव करायचे. यामध्ये वेलची पूड, सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे घालून थोडेसे दूध घालून हा हलवा छान शिजवायचा. गाजराचा गरमागरम हलवा अगदी नुसताही खायला छान लागतो.
6 / 8
आपण शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स, फळांचा रस, फळांचे बारीक काप घालून वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर्ड शिरा बनवू शकतो. नैवेद्य व प्रसादासाठी नेहमी तोच पारंपरिक पद्धतीचा शिरा बनविण्याऐवजी आपण अननसाचा वापर करून अननसाचा शिरा तयार करू शकतो. आपण नेहमीप्रमाणे शिरा करतो तसाच शिरा करून त्यात अननसाचा पल्प किंवा बारीक काप करून घालावेत अननसाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे.
7 / 8
तांदुळाच्या खिरीप्रमाणेच आपण अगदी झटपट होणारी शेवयांची खीर देखील करू शकतो. शेवया आणि ड्रायफ्रुट्सचे काप हलकेच तुपावर परतवून मग त्यात दूध, साखर चवीनुसार वेलची पूड घालूंन शेवयांची खिर तयार करून घ्यावी.
8 / 8
गव्हाचे पीठ, रवा, मावा, वेलची पावडर, दूध एकत्रित करून मालपुआचे बॅटर तयार करून घ्यावे. पॅनला थोडेसे तूप लावून त्यावर हे बॅटर ओतून मालपुआ खरपूस भाजून तयार करावा. तयार मालपुआ साखरेच्या पाकात सोडून व्यवस्थित घोळवून घ्यावा.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी