शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सचिन तेंडुलकरकडून शिका स्वयंपाक, पाहा सचिनने स्वत: केलेल्या पदार्थांचे खास व्हिडिओ आणि रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 16:22 IST

1 / 7
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar's Love for Food) जे करतो ते बेस्ट करतो. नुकतीच मास्टर्स क्रिकेट स्पर्धेतही त्यानं जबरदस्त (Sachin Tendulkar Talks About His Cooking Skills) कामगिरी केली. त्याचा स्ट्रेस ड्राइव्ह पाहत राहवा तसं त्याचं कुकिंग कौशल्यही.
2 / 7
कर्तबगार पुरुष घरात स्वयंपाक करत नाहीत (Foodie Sachin Tendulkar talks about his love for food) असे चुकीचे समज त्यानं कधीच मोडीत काढले. तो खवय्या आहे, तसा उत्तम स्वयंपाकही करतो.
3 / 7
आत्तापर्यंत सचिनने स्वयंपाकघरात केलेल्या अनेक पदार्थांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मित्रांना घरी बोलावून बार्बेक्यू करण्यातही त्याचा हातखंडा आहे.
4 / 7
सचिनला वांग्याचं भरीत फार आवडत. त्याच्या पद्धतीने केलं तर वांग खरपूस भाजून घेऊन मग कांदा- टोमॅटो तेलावर परतून त्यात मसाले आणि भाजून घेतलेलं वांग घालायचे. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. सचिनचे हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ त्याची आई, बायको व मुलगी सारासाठी एकदा महिला दिनाला केला होता.
5 / 7
सचिनने उन्हाळा सिझनसाठी खास आंब्याची कुल्फी केली होती. तो व्हिडीओ देखील बराच व्हायरल होतो. आंब्याचा गर काढून घ्यायचा, कोय काढायची. मग आंब्याचा गर आणि दूध थोडे हलकेच आटवून घ्यावे. मग शिजवून घेतलेला हा पल्प पुन्हा त्या आंब्यात भरून आंबे बाऊलमध्ये उभे ठेवून ते फ्रिजरमध्ये ठेवून द्यायचे. आंब्यावरची साल काढून घेतल्यानंतर या मँगो कुल्फीचे गोल चकती सारखे तुकडे कापून मस्त गारेगार खायचे.
6 / 7
वरणभातही त्याला फार आवडतेा. वरणभात तूप लिंबू हे आवडतं कॉम्बिनेशन.बरेचदा सचिन आपल्या घरातील सगळ्यांसाठीच गरमागरम वरण - भात करत असतो.
7 / 7
क्रिएटिव्हिटी अशी प्रत्येक गोष्टीत असते, मनापासून आणि प्रेमपूर्वक गोष्टी केल्या तर त्या उत्तमच होतात. सचिन कायम तेच तर सांगत असतो.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलfoodअन्नRecipeपाककृतीSachin Tendulkarसचिन तेंडुलकर