शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गॅसही न पेटवता करा उपवासाच्या साबुदाणा-बटाटा चकल्या, रेसिपी एकदम सोपी-वाळवणाची मजाच न्यारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:34 IST

1 / 7
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी काही ना काही वाळवण नक्कीच केले जाते (summer special recipe). त्यामध्ये चकल्या, चिप्स असे उपवासाचे पदार्थही असतातच..(sabudana batata chakali recipe)
2 / 7
उपवासाच्या दिवशी खुसखुशीत चकल्या असतील तर फराळाची मजा नक्कीच वाढते. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये उपवासाला चालणाऱ्या बटाटा- साबुदाणा चकल्या अगदी वर्षभर पुरतील एवढ्या एकदाच करून ठेवल्या जातात.(summer special recipe of making sabudana potato chakali)
3 / 7
तुम्हालाही उपवासाच्या बटाटा- साबुदाणा चकल्या करायच्या असतील तर ही एक सगळ्यात सोपी रेसिपी पाहा.. या रेसिपीमुळे चकल्या अगदी खुसखुशीत होतील शिवाय त्या नक्कीच त्यांच्या आकारमानापेक्षा दुप्पट, तीनपट फुलून येतील.
4 / 7
यासाठी सगळ्यात आधी अर्धा किलो साबुदाणा घ्या. तो दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर ७ ते ८ तासांसाठी पाण्यात भिजत घाला.
5 / 7
यानंतर अर्धा किलो बटाटे घ्या आणि ते उकडून घ्या.
6 / 7
आता मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, जिरे यांचं बारीक वाटण करा. हिरव्या मिरच्या नको असतील तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. ७ ते ८ तासांनी साबुदाणा व्यवस्थित भिजला की मग तो हातानेच थोडा कुस्करून घ्या. त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घाला. हिरव्या मिरच्या आणि जिरे यांचं वाटण आणि चवीनुसार मीठ घाला आणि सगळे पदार्थ हाताने मळून छान एकजीव करून घ्या.
7 / 7
आता हे मिश्रण चकल्या करण्याच्या सोऱ्यामध्ये घालून त्याच्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराच्या चकल्या करा.. या चकल्या १- २ दिवस उन्हात कडक वाळू द्या आणि नंतर तळून पाहा..
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Summer Specialसमर स्पेशलFasting & Foodनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४