शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan Rangoli Designs: ओवाळणी करताना पाटाभोवती काढा सुबक- रेखीव रांगोळी, बांधा राखी प्रेमानं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 15:23 IST

1 / 10
'रक्षाबंधन' हा बहीण - भावाच्या अतूट नात्यांतील महत्वाचा सण! या दिवशी बहिण (easy rakshabandhan rangoli pattern) आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. राखी पौर्णिमेच्या या पवित्र क्षणाला अधिक मंगलमय आणि सुंदर करण्यासाठी पाटाभोवती काढलेली आकर्षक रांगोळी विशेष महत्त्वाची ठरते. रंगीबेरंगी, पारंपरिक आणि कलात्मक रांगोळीची सजावट या सणाचा उत्साह दुपटीने वाढवते. बहीण - भावाच्या नात्यातील हा क्षण अधिक खास करण्यासाठी ओवाळणीचे ताट, पाटावरचा दिवा आणि पाटाभोवतीची सुंदर रांगोळी खूप महत्त्वाची असते.
2 / 10
रक्षाबंधनासाठी खास काढलेली रांगोळी घराला एक वेगळाच (Rakshabandhan Special Rangoli Design) पारंपरिक आणि उत्साही आनंद देते. पाटाभोवती काढलेल्या रांगोळीचे डिझाइन्स सोपे असले तरी ते खूप आकर्षक दिसतात. रक्षाबंधननिमित्त भावाला ओवाळणी करताना पाटाभोवती काढता येतील अशा सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स पाहूयात ज्या तुमच्या या खास क्षणाला अधिक रंगतदार करतील.
3 / 10
जर तुम्हांला फारशी मोठी रांगोळी काढायची नसेल, तर आपण ही साधीसुधी पण तितकीच आकर्षक अशी सुंदर व रेखीव पानाफुलांची रांगोळी काढू शकता.
4 / 10
रांगोळीच्या विविध रंगांचा वापर करून देखील आपण ही सुंदर व काढायला सोपी अशी मोर पंखी रांगोळीची डिझाईन काढू शकता. यातील विविध रंगांच्या रंगसंगतीमुळे ही रांगोळी अधिकच उठून दिसते.
5 / 10
जर आपल्याकडे रांगोळीचे रंग उपलब्ध नसतील तर आपण फक्त पांढऱ्या रंगाच्या रांगोळीच्या मदतीने सोपी आणि झटपट अशी फुलांची रांगोळी काढू शकतो.
6 / 10
आपण पाटाभोवती अजून काही खास अशा सुंदर डिझाईन्सच्या शोभिवंत रांगोळ्या काढू शकतो.
7 / 10
रांगोळी खूप सुंदर काढता येत असेल आणि जागेची अडचण नसेल तर आपण अशा प्रकारची रेखीव व सुबक अशी रांगोळी काढू शकते.
8 / 10
जर आपल्याला अधिक सुंदर व आकर्षक सजावट करायची असेल तर आपण असे वेगवेगळ्या डिझाइन्सचे पाठ ठेवून त्याभोवती देखील रांगोळी काढू शकता.
9 / 10
पाटाभोवती आपण रांगोळी म्हणून पानाफुलांचा देखील वापर करु शकता. वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या व विविध आकारांच्या पानाने देखील सुबक अशी सजावट अगदी झटपट करता येते.
10 / 10
आपण सजावट करण्यासाठी चांदीचा पाट देखील ठेवू शकता. पाटाभोवती पानाफुलांची सुंदर अशी रांगोळी व दिव्यांची आरास करून देखील आपण अधिक चांगली सजावट करु शकता.
टॅग्स :rangoliरांगोळीSocial Viralसोशल व्हायरलRaksha Bandhanरक्षाबंधनShravan Specialश्रावण स्पेशलIndian Festivalsभारतीय उत्सव-सण