शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौरी- गणपतीच्या सणासाठी करा मोत्यांचा साज! बघा मोत्याच्या दागिन्यांचे देखणे सुंदर प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2024 09:20 IST

1 / 7
सोन्याच्या दागिन्यांना वेगळीच झळाळी असली तरी मोत्याच्या दागिन्यांचे सौंदर्य काही वेगळेच असते. गौरी गणपतीच्या सणादरम्यान एखाद्या दिवशी मोत्याचे दागिने घालून छान तयार व्हा.. तुमच्या घरच्या गौरी किंवा महालक्ष्मीसाठीही तुम्ही मोत्याचे दागिने खरेदी करू शकता.
2 / 7
मोत्याची चिंचपेटी हा एक अतिशय लोकप्रिय दागिना.. गळ्याभोवती फिट बसणारा हा दागिना सौंदर्य खुलविणारा ठरतो.
3 / 7
गळ्याशी चिंचपेटी आणि त्याखाली हा लांब तन्मणी घातला की मग इतर कोणत्याही दागिन्याची गरज पडत नाही. किंवा नुसता तन्मणी गळ्यात घातला तरी तो खूप आकर्षक वाढतो.
4 / 7
हल्ली बऱ्याच ठिकाणी आता अशी मोत्याची ठुशी देखील मिळते. मोत्याच्या ठुशीचा हा प्रकार लहान मुलींनाही खूप छान दिसतो.
5 / 7
मोत्याच्या अशा टपोऱ्या बांगड्या हातात असल्या की मग इतर कोणत्या बांगड्यांची गरजच नाही..
6 / 7
कानातल्यांचे इतर अनेक प्रकार एकीकडे आणि लक्षवेधी टपोऱ्या कुड्या एकीकडे. हल्ली पारंपरिक कुड्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आले आहेत.
7 / 7
अशा पद्धतीच्या मोत्यांच्या बुगड्या घालण्याची फॅशनही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. त्यामध्येही अनेक नवनविन प्रकार पाहायला मिळतात.
टॅग्स :fashionफॅशनjewelleryदागिनेMakeup Tipsमेकअप टिप्सGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४