शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nail Jewelry : नेल आर्टनंतर आता नेल ज्वेलरीचा भन्नाट क्लासी ट्रेंड; पाहा हे नखांचे नवे दागिने आहेत तरी कसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:31 IST

1 / 7
दागिन्यांमध्ये नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स येत असतात. नेल आर्ट म्हणजेच नखांवर वेगवेगळ्या प्रकारचे काम तुम्ही पाहिले असेल. आता नखांचे दागिनेसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. फक्त नखांना शोभेल अशी नेल पॉलिश आता जूनी झाली आहे.
2 / 7
आता नेल ज्वेलरीकडे महिलांचा कल वाढला आहे. नेल आर्टमध्ये सर्व डिझाईन्स आणि जेल नेल विस्तारानंतर, आता ​​दागिन्यांचा एक नवीन ट्रेंड आला आहे. नखं सजवण्यासाठी लोकांना नेल आर्टच्या माध्यमातून नखांवर पेस्ट केलेले दागिने मिळत आहेत. नखांचे दागिने म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया.
3 / 7
नखांच्या दागिन्यांमध्ये नेल आर्ट डिझाईनसह दागिन्यांचे छोटे तुकडे असतात. हे दागिने कधीकधी बोटांपासून नखांपर्यंत नेले जातात. याशिवाय त्यावर मेटल वायर आणि रिंग देखील बसवले जाते. साखळ्यांपासून ते स्टायलिश स्टार्सच्या सुंदर डिझाईन्स तसेच फुले, प्राणी डिझाईन्स, ज्योतिषशास्त्रीय होलोग्राफिक डिझाईन्स नखांवर बनवल्या जात आहेत.
4 / 7
लोक आता जुन्या नेल आर्ट डिझाईनला कंटाळले आहेत, म्हणून आता ते बदलून नवीन डिझाईन बनवत आहेत आणि त्यावर दागिने बसवले जात आहेत.
5 / 7
नेल ज्वेलरीसाठी प्रथम नेल आर्ट केले जाते. अशा स्थितीत बेस सुंदर दिसण्यासाठी ग्रीन नेल आर्ट, ओम्ब्रे नेल आर्ट, थ्रीडी नेल आर्ट आणि फ्लोरल डिझाईन्सचा वापर केला जात आहे. सौंदर्य तज्ञ नुपूर गुप्ता यांच्या मते, बेस जितका सुंदर असेल तितका त्यावर दागिने असतील.(Image credit : tr.dhgate)
6 / 7
नेल ज्वेलरीमध्ये, सिरोव्स्की हँगिंग्ज, चेन, थ्रीडी मिक्स करून नेल पिअरिंग, रॅपिंग आणि हँगिंग केलं जातं.
7 / 7
बेस डिझाईनमध्ये क्रोम स्टाईल हेवी नेल आर्ट, 8-डी डिझाईन आहे जे आपण हाताने तयार करू शकतो. यामध्ये, डिझाईन्ससाठी siroskies देखील लावले जाते. हे खराब होत नाही आणि क्लासी लूक देते
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन