शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समंथा प्रभूसारखं सौंदर्य- फिटनेस पाहिजे तर 'अशी' करा दिवसाची सुरुवात- बघा ती काय सांगते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 17:39 IST

1 / 5
अभिनेत्री समंथा प्रभू हिचं सौंदर्य आणि फिटनेस हा नेहमीच अनेकांसाठी उत्सूकतेचा विषय असतो. याविषयीच्या काही पोस्ट ती सोशल मिडियावरही बऱ्याचदा शेअर करते.
2 / 5
आता नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती दिवसाची सुरुवात कोणत्या खास पद्धतीने करते, याविषयी माहिती सांगत आहे. तिच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग samantharuthprabhuoffl या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
3 / 5
यामध्ये ती सांगते की ती सकाळी ५: ३० वाजता उठते. त्यानंतर सगळ्यात आधी स्वत:कडे असलेल्या चांगल्या गोष्टी, पॉझिटीव्ह गोष्टी लिहून काढते आणि त्यासाठी आभार व्यक्त करते. असं केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, असं ती मानते.
4 / 5
त्यानंतर ती काही मिनिटांसाठी सुर्यप्रकाशात उभी राहते. त्यानंतर wim hof पद्धतीने प्राणायाम आणि मेडिटेशन करण्यावर तिचा भर असतो. सध्या ती २५ मिनिटांसाठी इश क्रिया करते. याचा खूप चांगला परिणाम जाणवत असल्याचं ती म्हणते.
5 / 5
मागील काही दिवसांपासून तिने टॅपिंग म्हणजेच हलक्या हाताने किंवा हाताच्या बोटांच्या टोकाने चेहऱ्यावर थापटून मसाज करणे, असंही सुरू केलं आहे. यामुळे एनर्जी बॅलेन्स होण्यासाठी आणि स्ट्रेस, दुखणं कमी होण्यासाठी मदत होते.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सSamantha Akkineniसमांथा अक्कीनेनीBeauty Tipsब्यूटी टिप्सInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरल