शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी पारेखने नेसली ‘साडी विथ जॅकेट’-बघा फोटो-करा दिवाळीत स्पेशल लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2024 19:18 IST

1 / 8
त्याच त्या टिपिकल पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा साडी विथ जॅकेट हा एक नवा प्रकार ट्राय करून पाहा. हा प्रकार सध्या खूप ट्रेण्डी असून हिवाळ्यात येणाऱ्या लग्नसराईमध्ये तर तो खूपच हीट ठरतो.
2 / 8
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख हिने पुरस्कार सोहळ्यासाठी जी साडी नेसली होती, त्यावर तिने अतिशय सुंदर वर्क असणारं जॅकेट घातलं होतं. त्यामुळेच पुन्हा एकदा साडी विथ जॅकेटचा ट्रेण्ड चर्चेत आला आहे.
3 / 8
तुम्हालाही दसरा- दिवाळीसाठी किंवा लवकरच येणाऱ्या लग्नसराईसाठी असा लूक करायचा असेल तर या काही मस्त आयडिया पाहा..काजोलची साडी प्लेन आहे. पण तिच्या जॅकेटमुळे तिचा लूक उठून दिसतो आहे. अशा तुमच्याकडच्या एखाद्या साध्या साडीवर तुम्ही असं लाँग जॅकेट ट्राय करू शकता.
4 / 8
सोनम कपूरचं हे हेवी वर्क असणारं जॅकेट तिला खूप ग्लॅमरस लूक देणारं ठरलं आहे.
5 / 8
अशी एखादी शिफॉन किंवा ऑर्गेंझा किंवा फ्लोरल प्रिंटची साडी असेल तर त्यावर असं जॅकेट खूप छान वाटेल. ऑफिसच्या एखाद्या फॉर्मल कार्यक्रमासाठीही तुम्ही हा लूक करू शकता.
6 / 8
अभिनेत्री हिना खानचा हा एक साडी विथ जॅकेटमधला सुंदर लूक पाहा...
7 / 8
हा प्रकार आपल्याला साडी विथ जॅकेट प्रकारातला वाटतो. पण हे एक लाँग ब्लाऊज असून त्याला पुर्णपणे जॅकेट लूक देण्यात आला आहे.
8 / 8
गोल्डन रंगाचं जॅकेट बऱ्याच साड्यांवर मॅच होतं. त्यामुळे असं एखादं जॅकेट तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही.
टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सsaree drapingसाडी नेसणेStyling Tipsस्टायलिंग टिप्स