शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2026 : संक्रातीच्या हळदीकुंकवासाठी हवाच सुंदर कुंकवाचा करंडा, पाहा करंड्यांचे १० सुंदर नवे प्रकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 20:39 IST

1 / 13
मकर संक्रांत म्हटलं की, तिळगुळाचा गोडवा आणि सुवासिनींचा लाडका 'हळदी-कुंकू' समारंभ आलाच...घराघरात सुवासिनींची लगबग सुरू होते, वाण लुटले जाते आणि एकमेकींच्या कपाळावर हळद-कुंकू लावून सौभाग्याचे लेणे जपले जाते. या खास प्रसंगी आपण घराची सजावट तर करतोच, पण ज्या पात्रातून आपण हळदी - कुंकू देतो, तो 'करंडा' देखील तितकाच आकर्षक आणि सुंदर असायला हवा(Makar Sankranti special haldi kunku karanda design).
2 / 13
हळद – कुंकू ठेवण्यासाठी वापरला जाणारा करंडा फक्त उपयोगीच नाहीत, तर कार्यक्रमाची (haldi kunku karanda designs for Makar Sankranti) शोभा वाढवणारे देखील असतात. आकर्षक रंग, नक्षीकाम, पारंपरिक तसेच मॉडर्न डिझाईन्समुळे हळदी – कुंकवाचा करंडा अधिक खास दिसतो. साध्या प्लास्टिकपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक कलात्मक करंड्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे हळदी – कुंकवाच्या कार्यक्रमाला एक वेगळाच लुक देतात.
3 / 13
आजकाल बाजारात पारंपरिक पितळी करंड्यांपासून ते आधुनिक हॅन्डमेड आणि (attractive haldi kunku karanda designs) नक्षीदार करंड्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतील असे काही लेटेस्ट आणि ट्रेंडी हळद-कुंकू करंडा डिझाईन्स पाहूयात...
4 / 13
दोन किंवा तीन कप्प्यांचा हा करंडा अत्यंत राजेशाही दिसतो. मोराची सुंदर नक्षी आणि त्यावर केलेले मीनाकाम आकर्षक वाटते.
5 / 13
कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उघडणारा हा करंडा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पूजेच्या ताटात हा करंडा ठेवल्यास ताटाची शोभा अधिक वाढते.
6 / 13
ज्यांना साधे पण अगदी रॉयल डिझाईन आवडते, त्यांच्यासाठी कोरीव काम असलेला चांदीचा करंडा उत्तम पर्याय आहे.
7 / 13
पर्यावरणपूरक पर्याय हवा असल्यास लाकडावर हाताने पेंटिंग केलेले (उदा. वारली आर्ट) करंडे वापरता येतात.
8 / 13
खास सणासुदीसाठी कुंदन, खडे आणि मोत्यांनी सजवलेला करंडा खूप उठावदार आणि सुंदर दिसतात.
9 / 13
मांगल्याचे प्रतीक म्हणून शंख किंवा छोट्या कलशाच्या आकाराचे करंडे ही एक वेगळी आणि सुंदर निवड ठरू शकते.
10 / 13
हलके, टिकाऊ आणि विविध रंगांत उपलब्ध असल्यामुळे हळदी–कुंकवासाठी आजकाल असे प्लास्टिकचे रंगीबेरंगी करंडे फारच लोकप्रिय आहेत.
11 / 13
मखमली कापड किंवा अगदी खणाच्या कापडाचा सुंदर व आकर्षक पद्धतीने वापर करून, लेस आणि मण्यांच्या सजावटीमुळे हे करंडे अतिशय आकर्षक दिसतात.
12 / 13
मकरसंक्रांतीच्या खास सणासाठी आपण अशाप्रकारे पतंगच्या आकाराचे तसेच विविध रंगांचे सुंदर आणि आकर्षक असे अनेक डिझाइन्सच्या हळदी - कुंकवाचे करंडे विकत घेऊन मकरसंक्रातीतील हळदी - कुंकवाचा सण अधिक खास करू शकता.
13 / 13
हळदी - कुंकवाच्या खास प्रसंगी आपण अशा प्रकारचे आर्टिफिशल फुलांनी सजवलेल्या डिझाइन्सचे अधिक आकर्षक दिसणारे करंड्याचे वेगवेगळे प्रकार देखील हमखास विकत घेऊ शकता.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMakar Sankrantiमकर संक्रांती