1 / 10अंगावर शहारा येण्यामागील कारणे जाणून घ्या. असं काय होतं की अंगावर अचानक काटा येतो.2 / 10याला पायलोमोटर रिफ्लेक्स असेही म्हणतात. अंगावरील केसांच्या तळाशी असणार्या मासपेशी आकुंचन पावतात. त्यावरील केस उभे राहतात. यालाच आपण अंगावर शहारा येणं म्हणतो.3 / 10ही प्रक्रिया भावनांवर आधारित असते. आनंद झाल्यावर असे होते. भीती वाटल्यावर होते. उत्साहाने होते. अनेक कारणे असतात.4 / 10शरीरावरील केसांमध्ये हवा खेळती राहते. त्वचेजवळ इन्सुलेशनचा थर तयार होतो. त्यामुळे शरीरातील उष्णता तशीच राहते. 5 / 10शरीराला अचानक गार वारा लागला की, कोशांमधील स्नायु आकुंचित होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात अंगावर शहारे येतात. शरीर उष्णता मिळवण्याचा प्रयत्न करत असते. 6 / 10मेंदूमध्ये भावनांवर नियंत्रण ठेवणारा एक भाग असतो. मेंदूमधील अमिग्डाला आणि हायपोथालेमस हे दोन्ही चेतासंस्थेशी जोडलेले असतात. चेतासंस्था पायलोमोटरशी जोडलेली असते त्यामुळे भावना जागृत झाल्यावर शहारा येतो. 7 / 10त्वचा थंड पडली की केसांचे स्नायू ओढले जातात. त्यामुळे केसांवर परिणाम होतो. व ते उभे राहतात.8 / 10आवडीचे गाणे ऐकताना, चित्रपटाच्या एखाद्या दृष्यावेळी अंगावर काटा येतो. 9 / 10याचा संबंध मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टिमशी जोडलेला आहे. मेंदू शरीरातील डोपामाइन बाहेर सोडतो. त्याला आनंदाचा संप्रेरक असेही म्हणतात.10 / 10मेंदूत होणार्या विविध प्रक्रियांमुळेही अंगावर शहारा येतो. कधीतरी काहीच कारण नसताना अचानक शहारा येतो. कारण मेंदूत काही तरी सुरू असते जे आपल्याला जाणवत नाही.