शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा काजोलला पहिल्यांदा कळलं, की आपणही "सुंदर" आहोत! आणि मग.. वाचा काजोलच्या सौंदर्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:51 IST

1 / 10
आज सुप्रसिद्ध बॉडिवूड अभिनेत्री काजोलचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर काजोलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. काजोल (Kajol's Birthday) एक अशी अभिनेत्री आहे जिला तुम्ही एजलेस म्हणू शकता. म्हणजेच काजोलच्या वाढत्या वयाचा फिटनेस आणि सुंदरतेवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस काजोल जास्तच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
2 / 10
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा काजोलला तिच्या सौंदर्याच्या रहस्याबाबत विचारण्यात आले तेव्हा काजोल म्हणाली की, ''मला हे पहिल्यांदा कळले जेव्हा माझ्या मुलीच्या जन्माला जवळजवळ 6 महिने उलटले होते. मी स्वतःला आरशात पाहून आश्चर्यचकित झाले.''
3 / 10
काजोलनं सांगितले की, ''मी वयाच्या १५- १६ वर्षांची असताना चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यावेळी मी कशी दिसतेय, याची जाणीव मला नव्हती, मला खूप आणि बिंधास्तपणे राहणायला आवडायचं. एका शब्दात म्हणायचं झालं तर मी खूपच बेपर्वा होते.''
4 / 10
वयाच्या २० व्या वर्षी मला कॉम्प्लिमेंट्स मिळायला सुरूवात झाली. 'काजोल यू आर सो ब्यूटीफुल' 'यू आर सो प्रिटी' असं कोणी म्हणालं तर मी हमखास दुर्लक्ष करायचे. कारण मी सुंदर नसून कूल आहे असं मला वाटायचं''
5 / 10
काजोल पुढे म्हणाली की, ''न्यासाला जन्म दिल्यानंतर एक आई असल्यानं जबाबदारी वाढली. नंतर मी स्वतःचा फिटनेस आणि हेल्थवर जास्त लक्ष द्यायला सुरूवात केली. त्याचदरम्यान मी आरश्यात पाहिल्यानंतर डोक्यात विचार आला की, 'Wow I So Beautiful''I am So Stunning' . माझ्या आयुष्याचा पहिला दिवस होता जेव्हा मला कळले की मी सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे या नंतर मला लक्षात आले की मला सौंदर्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रशंसा मिळू लागली आहे.''
6 / 10
आपल्या सुंदरतेचं सिक्रेट शेअर करताना काजोल सांगते की, ''सुरूवातीला मी डाएट आणि वर्कआऊटबाबत फारशी जागरूक नव्हते. पण मुलीच्या जन्मानंतर मी यावर अधिक लक्ष देण्यात सुरूवात केली. त्यानंतर याचा परिणाम मला दिसू लागला.
7 / 10
म्हणूनच मला सगळ्या स्त्रियांना सल्ला द्यायला आवडेल की, संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःला वेळ द्या. आपली सुंदरता टिकवून ठेवण्याासठी डाएटवर लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा.''
8 / 10
रोजच्या रूटीनबाबत बोलताना काजोल सांगते की, ''आधी मी माझ्या फिटनेसबाबत इतकी जागरूक नव्हते. पण आता मात्र आहे. संपूर्ण दिवस कितीही व्यस्त असेल तरीही मी स्वतःसाठी ३० मिनिट वेळ काढून व्यायाम करते. जेव्हा वेळ असतो तेव्हा मी दीड ते २ तासही जीममध्ये घालवते. कारण हेच माझ्या सौंदर्याचे सिक्रेट आहे.
9 / 10
स्किन केअर कॉस्मॅटिक्सबाबत मी आता बोलणार नाही पण सुंदरता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल डाएट आणि व्यायामाचा असतो.''
10 / 10
(Image Credit- Social media)
टॅग्स :KajolकाजोलCelebrityसेलिब्रिटीbollywoodबॉलिवूड