शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    बद्धकोष्ठतेचा त्रास, ब्लड शुगरही वाढली? ७ दिवस प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक, पचनाचे त्रास होतील कमी

    By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 17:04 IST

    1 / 8
    अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. (Blood Sugar and Constipation)
    2 / 8
    त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा. (Boost Blood Sugar and Relieve Constipation in 7 Days)
    3 / 8
    ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास कमी होईल. (7-Day Plan to Improve Blood Sugar and Digestive Health)
    4 / 8
    कोरफडीचा रस विषारी गुणधर्मासाठी ओळखला जातो. याचा रस प्यायल्याने पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे जळजळ कमी होते.
    5 / 8
    हळदीचे दूध प्यायल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. हळदीत असणारे घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
    6 / 8
    जिऱ्यामध्ये असलेले घटक रक्तदाब नियंत्रित करतात. ज्यामुळे दमा, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासंबंधित समस्या दूर होतात. त्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यात जिरे उकळवून त्याचे पाणी प्या.
    7 / 8
    आवळा ज्यूस सकाळी प्यायल्याने ताप, घशाचे विकार आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्वचेसाठी देखील आवळा गुणकारी ठरतो. यासाठी नियमितपणे आवळ्याचा ज्यूस प्या.
    8 / 8
    झोपेतून उठल्यानंतर मळमळ किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर आले-लिंबाचा चहा घ्यावा. यात असणारे व्हिटॅमिन सी पाचन वाढवण्यास मदत करते.
    टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना