बाल्कनीत विष्ठेचा वास येतो-कबुतरांचा उच्छाद? ५ उपाय, एकही कबुतर घाण करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:27 IST
1 / 7खिडक्यांच्या पत्र्यांवर, बाल्कनीतील टाईल्सवर नेहमीच कबुतरं येत असतात. कबुतरांची विष्ठा बाल्कनीत साचल्यानंतर खूपच दुर्गंध पसरतो आणि ही दुर्गंधी साफ कशी करायची हे एक मोठं टेंशन असतं. (How To Remove Pigeons From Balcony)2 / 7कबुतरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. ज्यामुळे त्यांची विष्ठाही साफ करावी लागणार नाही ना दुर्गंध येणार. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही. (5 Methods To Remove Pigeons From Your Roof)3 / 7कबुतरांना रोखण्यासाठी हा उत्तम उपाय. बाल्कनीत जाळी लावल्यास कबुतरं आत प्रवेश करणार नाहीत. प्लास्टीक किंवा नायलॉनच्या जाळीचा वापर करू शकता.4 / 7जसं की अल्युमिनियम फॉईल, मिंट ऑईल, तिखट स्प्रे हे पदार्थ बाल्कनीत ठेवल्यास कबुतरं घरात शिरणार नाहीत.5 / 7बाल्कनीत तु्म्ही भरपूर सामान ठेवला असेल तर तो आधी काढून टाका. जितकी मोकळी आणि स्वच्छ जागा असेल तितकेच कबुतरं प्रवेश करणार नाहीत.6 / 7हे प्लास्टीक किंवा स्टिलचे छोटे खिळे असतात जे तुम्ही बाल्कनीच्या कठड्यांवर, खिडकीच्या कडेला लावू शकता. ज्यामुळे कबुतरांना बसायला जागा मिळत नाही आणि ते उडून जातात.7 / 7कबुतरांना चमकणाऱ्या आणि परावर्तित होणाऱ्या वस्तूंचा त्रास होतो. म्हणून चमकदार वस्तू बाल्कनीत ठेवा.कलरफुल रिबन्स, चमचमणारे बॉल्स ठेवल्यास कबुतरं बाल्कनीत येणारच नाही.