1 / 7काही जणींच्या चेहऱ्यावर म्हणजेच कानाच्या आसपासच्या भागात, कपाळावर, ओठांच्यावर बरेच केस असतात. अशा पद्धतीच्या फेशियल हेअरमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. सौंदर्य कमी होतं.(how to remove facial hair?)2 / 7म्हणूनच फेशियल हेअर काढून टाकायचे असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home hacks to remove facial hair)3 / 7हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा जिलेटीन पावडर घ्या.(how to make face mask to get rid of facial hair?)4 / 7त्यामध्ये १ चमचा मिल्क पावडर घाला. मिल्क पावडरमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.5 / 7आता त्यामध्ये १ चमचा हळद घाला. हळदीमुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.6 / 7सगळ्यात शेवटी त्यामध्ये गरम दूध घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी लेप सुकला की अलगदपणे तो ओढून काढून टाका.7 / 7हा उपाय केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुूवून मॉईश्चराईज करा. फेशियल हेअर बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील. पण हा उपाय सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. त्यामुळे एकदा पॅच टेस्ट जरुर घ्या.