शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:19 IST

1 / 7
मुलींना हल्ली कमी वयातच पाळी सुरू होत आहे. काही वर्षांपुर्वी मुलींना नववी, दहावी या इयत्तांमध्ये असताना पाळी यायची. पण आता मात्र इयत्ता चौथीमध्ये असताना पाळी सुरू झालेल्या अनेक मुली दिसत आहेत.(How to prevent early periods in girl child?)
2 / 7
मुलींना लवकर पाळी येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्या नेमक्या कोणत्या याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी yogjourney या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की तुमच्या मुलींना कमी वयात पाळी सुरू होऊ द्यायची नसेल तर त्यांच्या बाबतीत काही गोष्टी पुर्णपणे बंद करा. त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया..
3 / 7
मुलींना कोणत्याही प्रकारचे बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंग तसेच शुगरी ड्रिंक देऊ नका.
4 / 7
मुलींना नेलपेंट किंवा इतर कॉस्मेटिक्सपासून दूर ठेवा. कारण त्यांच्यामध्ये endocrine disrupting chemicals असतात ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात इस्ट्रोजीन असते. जेव्हा त्यांचा वापर केला जातो तेव्हा त्याच्यातले काही सुक्ष्म अंश त्वचेमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
5 / 7
मुलींना रोजच लोणचं खायला देऊ नका. त्याच्यामध्ये असणाऱ्या भरपूर सोडियममुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याच्या परिणामामुळेही पाळी लवकर येऊ शकते.
6 / 7
दररोजच ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळलेले अन्नपदार्थ त्यांना खायला देऊ नका.
7 / 7
फळं धुण्यासाठी नेहमी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचे मिश्रण वापरा. जेणेकरून त्यांच्यावर फवारलेले केमिकल्स पुर्णपणे निघून जातील.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यfoodअन्न