शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोकं खूप ठणकतंय? पाण्यात २ पदार्थ मिसळून प्या, काही मिनिटांतच डोकेदुखी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 09:20 IST

1 / 6
अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कित्येकांची नेहमीचीच तक्रार असते की डोकं खूप दुखतंय..
2 / 6
महिलांचं प्रमाण तर यात जास्त आहे. खाण्यापिण्यात बदल झाला, मुलांवर चिडचिड झाली, कामाचा ताण वाढला की कित्येक महिलांचं डोकं खूप दुखतं..
3 / 6
डोकं दुखायला लागलं की अनेकांना लगेचच एखादी पेन किलर घेण्याची सवय असते. पण ही सवय अतिशय चुकीची असून वारंवार पेन किलर घेणं आरोग्यासाठी त्रासदायक आहे.
4 / 6
म्हणूनच हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी गॅसवर १ कप पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये थोडं आलं किसून टाका.
5 / 6
त्यातच थोडंसं मीठ घालून हे पाणी उकळवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि गरम गरम प्या. आल्यामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स तसेच इतर घटक डोकेदुखी लगेचच थांबविण्यासाठी मदत करतात.
6 / 6
त्यातच थोडंसं मीठ घालून हे पाणी उकळवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि गरम गरम प्या. आल्यामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स तसेच इतर घटक डोकेदुखी लगेचच थांबविण्यासाठी मदत करतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणीHome remedyहोम रेमेडी