शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 16:39 IST

1 / 8
सुट्टीच्या दिवशी किंवा नाश्त्याला आपल्याला इडली खाण्याची इच्छा होते. पण घरच्या घरी इडली करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे पीठ फुगत नाही. प्रमाण बरोबर असूनही पीठ आंबत नाही ज्यामुळे इडली घट्ट किंवा चिकट होते. (Idli batter)
2 / 8
अण्णाच्या गाड्यावर मिळणारी इडली नेहमीच मऊसुत आणि टम्म फुगलेली मिळते. कारण आंबवण्यासाठी काही खास ट्रिक वापरल्या जातात. अशाच काही खास ट्रिक वापरुन आपले इडलीचे पीठ झटपट फुगेल आणि हलकी-मऊसुत होईल. इडली कशी बनवायची पाहूया. (Idli fermentation tips)
3 / 8
इडली बनवताना पीठाचे प्रमाण योग्य असायला हवे. लक्षात ठेवा की, तांदूळ आणि उडीद डाळ याचे प्रमाण ३:१ असं असायला हवं. यामुळे इडली मऊ होते.
4 / 8
पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात इडलीचे पीठ आंबवण्यासाठी किंवा फुगण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यासाठी बॅटर ८ ते १० तास गरम ठिकाणी ठेवा. ज्यामुळे ते लवकर फुगेल.
5 / 8
पीठात थोडेसे भिजवलेले पोहे वाटून घाला. यामुळे इडली अधिक सॉफ्ट आणि स्पाँजी होण्यास मदत होते.
6 / 8
साध्या मिठाऐवजी पिठात रॉक सॉल्टचा वापर करा. यामुळे आंबवण्याच्या प्रक्रियेस मदत होते आणि पिठाची चव वाढते.
7 / 8
बॅटरमध्ये इनो घालून लगेच वाफवल्यास इडली अधिक मऊ होते. आपण बेकिंग सोडाच्या ऐवजी इनो वापरल्यास इडली फुगते.
8 / 8
वाफवताना आपल्याला इडली पात्राला तेल लावून मग बॅटर घाला. त्यानंतर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. जास्त वेळ वाफवल्यास इडली कोरडी होते.
टॅग्स :foodअन्नkitchen tipsकिचन टिप्स