शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

६ घरगुती पदार्थ चेहऱ्यावर आणतात आठवडाभरात तेज, थंडीत त्वचाही राहते मऊमुलायम! कशाला आणता महागड्या क्रिम्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 19:16 IST

1 / 9
थंडीचे दिवस सुरू झाले की, कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणातील ओलावा (best home treatment for dry skin) कमी होतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. या थंडीच्या दिवसात त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा एकदम ड्राय, कोरडी, रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास त्वचा फाटणे, पापुद्रे निघणे किंवा सुरकुत्या पडणे अशा गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
2 / 9
अशावेळी आपण लगेच बाजारातील विविध क्रीम्स, लोशन आणि मॉइश्चरायझरचा (home remedies for dry skin) वापर करतो. पण, आपल्या स्वयंपाकघरात आणि आजूबाजूला अनेक नैसर्गिक पदार्थ उपलब्ध असतात, जे त्वचेला आवश्यक हायड्रेशन आणि पोषण देऊन त्वचेला पुन्हा मऊ-मुलायम बनवू शकतात.
3 / 9
थंडीच्या दिवसांत त्वचेचा हरवलेला ओलावा परत मिळवून तिला सॉफ्ट आणि ग्लोइंग बनवण्यासाठी बाजारातील महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सऐवजी कोणते ५ नैसर्गिक पदार्थ वापरू शकतो ते पाहूयात.
4 / 9
खोबरेल तेलात फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असते, जे त्वचेसाठी मॉइश्चरायझरचे काम करते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळ केल्यानंतर लगेचच खोबरेल तेलाचे काही थेंब हातावर घ्या आणि त्वचेवर ५ ते १० मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा.
5 / 9
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणांत असते, जे फक्त रूक्ष, कोरड्या त्वचेला ओलावाच देत नाही, तर सुरकुत्या देखील कमी करते. दररोज बदामाच्या तेलाचे २ ते ३ थेंब घेऊन त्वचेवर लावून हळूवारपणे चोळून मसाज करावा.
6 / 9
आपण थंडीच्या दिवसांत आपल्या चेहऱ्यावर दुधाची साय देखील लावू शकता. दुधावरील साय त्वचा मऊ - मुलायम करण्यास फायदेशीर ठरते. दुधाच्या सायीत लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेला खोलवर पोषण देते. दुधावरील साय घेऊन १० ते १५ मिनिटे हलक्या हातांनी मसाज करू शकता.
7 / 9
आयुर्वेदामध्ये तिळाचे तेल त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. हे तेल त्वचेला उष्णता आणि ओलावा देते. यासोबतच यात अँटी- इंफ्लामेंटरी गुणधर्मही भरपूर असतात, जे त्वचेची सूज आणि कोरडेपणामुळे होणारी खाज कमी करतात.
8 / 9
हिवाळ्यात बहुतेकवेळा वातावरणातील गारव्याने आपली त्वचा खूपच ड्राय व रुक्ष होते. अशावेळी त्वचेला एलोवेरा जेल लावू शकता. यात कूलिंग गुणधर्म आहेत, जे त्वचा शांत करण्यास तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात.
9 / 9
कच्चे दूध हे उत्तम नैसर्गिक क्लीन्झर आणि मॉइश्चरायझर आहे. दुधात असलेले फॅट्स त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात. कापसाच्या बोळ्याने कच्चे दूध त्वचेवर लावा आणि १० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि कोरडेपणामुळे आलेला निस्तेजपणा दूर होतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीAyurvedic Home Remediesघरगुती उपायSkin Care Tipsत्वचेची काळजी