शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त १० रुपयांत होणारा घरगुती उपाय,घरातलं फर्निचर दिसेल नव्यासारखं-वाळवीही लागणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:25 IST

1 / 7
पावसाळ्याच्या दिवसांत घरातल्या लाकडी फर्निचरची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सगळीकडे दमट हवामान असतं. त्यामुळे फर्निचरला ओल येऊन ते खराब होण्याची भीती असते.
2 / 7
पावसाळ्यात जर फर्निचरची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर त्याला वाळवी लागण्याचीही शक्यता असतेच..
3 / 7
त्यामुळे अनेकजण ठराविक कालावधीनंतर फर्निचरला पॉलिशिंग करून घेतात किंवा मग त्यावर वूडन पेंट लावतात. जेणेकरून त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि शिवाय ते अगदी नव्यासारखं चकाचक होऊन जातं.
4 / 7
पण फर्निचरला चमक येण्यासाठी नेहमीच त्याच्यावर महागडा वूडन पेंट लावण्याची किंवा त्याला पॉलिशिंग करण्याची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही हा एक सोपा उपाय केला तरी जुनं फर्निचर अगदी नव्यासारखं लख्खं चमकेल.
5 / 7
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्या. त्यात १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला.
6 / 7
आता या पाण्यात कपडा बुडवा. तो घट्ट पिळून घ्या आणि मग त्याने फर्निचर पुसून घ्या.. ते अगदी नव्यासारखं चकाचक होईल.
7 / 7
खोबरेल तेलाऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता. या पद्धतीने आठवड्यातून एकदा फर्निचर पुसल्यास ते नेहमीच चमकदार दिसेल.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडीmonsoonमोसमी पाऊस