शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टॅनिंगपासून ब्लॅकहेड्सपर्यंत.. सगळ्या समस्यांवर खास घरगुती उपाय, त्वचा सोन्यासारखी चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 14:58 IST

1 / 8
आपल्या स्वयंपाक घरातलेच पदार्थ वापरून त्वचेच्या कित्येक समस्या अगदी सहज सोडवता येतात. त्यासाठी मग इतर कोणत्याही विकतच्या महागड्या क्रिमची, साबणची गरज पडत नाही.. ते उपाय कोणते आणि कसे करायचे ते पाहा..
2 / 8
चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असतील तर दही आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून डागांवर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून मॉईश्चराईज करा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. खूप चांगला फरक दिसून येईल.
3 / 8
जर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं खूप वाढली असतील बटाट्याचा रस रोज काही मिनिटांसाठी डोळ्यांभोवती लावा. डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतील.
4 / 8
जर चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर ग्लिसरीन आणि गुलाबजल हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावा.
5 / 8
ॲक्नेमुळे चेहरा खूपच खराब दिसायला लागला असेल तर त्यावर लवकर उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी टी ट्री ऑईल आणि ॲलोव्हेरा जेल एकत्र करून त्वचेला मालिश करा. चांगला बदल दिसून येईल.
6 / 8
त्वचेवर जर खूप टॅनिंग होऊन ती काळवंडली असेल तर बेसन, दही आणि तांदळाचं पीठ यांचा लेप चेहऱ्याला लावून मालिश करा. नंतर १० मिनिटांनी हळूवारपणे चोळून चेहरा धुवून टाका. त्वचा उजळेल.
7 / 8
थंडीमुळे त्वचा खूप कोरडी पडली असेल तर दही आणि साय एकत्र करून त्वचेवर लावा आणि मालिश करा. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.
8 / 8
नाकावर, ओठांजवळ ब्लॅकहेड्स दिसायला लागले असतील तर तांदळाच्या पिठामध्ये थोडी ज्येष्ठमध पावडर आणि थोडं ग्लिसरीन मिसळून ते लावा. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी होतील.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी