शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरुपुष्यामृत- चांदीच्या दिव्यांची करा खरेदी, पाहा चांदीच्या दिव्यांच्या सुंदर आणि परवडणारे डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 19:42 IST

1 / 11
दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत असा योग यावर्षी जुळून आला आहे. आता गुरुपुष्यामृत योगानिमित्त अनेक जण सोन्याची खरेदी करतात. पण सोनं खरेदी करणं आता महागाईमुळे कित्येकांना शक्य नाही.
2 / 11
त्यापेक्षा चांदी जरा स्वस्त आहे. त्यातच गुरुपुष्यामृत आणि दीप अमावस्या असं एकत्र आलं आहे. आता दीप अमावस्येला दिव्यांच्या पुजनाला खूप महत्त्व आहे. म्हणूनच यानिमित्ताने तुम्ही चांदीच्या दिव्यांची खरेदी करण्याचा विचार नक्की करू शकता.
3 / 11
चांदीच्या दिव्यांचे असे स्वस्तात मस्त कित्येक प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळतात.
4 / 11
लवकरच सुरू होणारा श्रावण महिना तसेच पुढे येणारे सणवार यामुळे चांदीच्या दिव्यांचे नवनविन प्रकार सराफा दुकानांमध्ये आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकतात.
5 / 11
हे दिवे वजनाला कमी असल्यामुळे त्यांची किंमतही कमी असते. त्यामुळे सर्वसामान्यांना ते नक्कीच परवडू शकतात.
6 / 11
असा एखादा छोटासा चांदीचा दिवा घेतला तर तो नक्कीच रोज देवापुढे किंवा तुळशीपुढे लावण्यासाठी उपयोगी येऊ शकतो.
7 / 11
या दिव्याला गणपती दिवा म्हणतात. त्यावर गणपतीच्या जागी लक्ष्मी, कुबेर, अष्टलक्ष्मी अशा वेगवेगळ्या मुर्तीही मिळतात.
8 / 11
फुलवाती लावण्यासाठी अशा प्रकारचा दिवा अगदी छान आहे.
9 / 11
त्या दिव्यांमध्येही असे अनेक सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात.
10 / 11
चांदीच्या दिव्यांमध्ये असे ॲण्टीक प्रकारातले दिवेही आलेले आहेत.
11 / 11
अगदी लहान आकारापासून ते मोठ्या समयांपर्यंत ॲण्टीक प्रकारात अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात.
टॅग्स :ShoppingखरेदीSilverचांदीGoldसोनंonlineऑनलाइन