1 / 8गणपती बाप्पाला काय आवडतं? तर अर्थातच मोदक. उकडीचे मोदक चतुर्थीला केले जातात. पोटभर आपण खातो. नंतर इतर दिवशी प्रसादाला काय करायचे असा प्रश्न मात्र सगळ्यांना पडतो. काही जणांकडे १० दिवसांचा गणपती असतो. रोज प्रसादाला तेच द्यायचे की नवीन काही द्यायचे? असा प्रश्न असतो. 2 / 8प्रसादासाठी देता येतील असे अनेक चवींचे मोदक आजकाल केले जातात. पेढ्यासारखेच असतात. फक्त चवीला जरा वेगळे लागतात. याला मिनी मोदक असेही म्हटले जाते. फार मस्त मिळतात. घरीही करु शकता. 3 / 8तळलेले मोदक घरोघरी केले जातात. गव्हाच्या पिठाचे हे मोदक चवीला मस्त असतात. खमंग असतात आणि करायलाही सोपे असतात. 4 / 8प्रसादासाठी द्यायला घरोघरी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मावा मोदक. लहान आणि साच्यातून केला जाणारा हा मोदक गणपतीच्या दिवसांमध्ये फार मागणीत असतो. 5 / 8एक वेगळा आणि छान प्रकार मध्यंतरी फार लोकप्रिय होता. तो प्रकार म्हणजे चॉकलेट मोदक. लहान मुलांनाही हा मोदक फार आवडतो. चॉकलेटचा मोदक गोड आणि मऊ असतो. 6 / 8काजू मोदक प्रसादासाठी अगदी छान आहे. काजूची पूड, साखर, खवा असे पदार्थ वापरुन हे मोदक करता येतात. त्यात इतरही सुकामेवा घालता येतो. 7 / 8जरा वेगळा आणि चवीला हटके असा पदार्थ म्हणजे पान मोदक. पानाच्या फ्लेवरचा हा मोदक फार छान चविष्ट असतो. आकाराला लहान असतो. पटकन खाऊन टाकायचा. 8 / 8गुलकंद मोदक हा एक एकदम भारी प्रकार आहे. दिसायला अगदी गुलाबीसर असणारा हा मोदक एकदम मस्त आणि भरपूर गोड लागतो.