शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Friendship Day 2025 : यारा तेरी यारों को.. पाहा फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या ५ पद्धती-दोस्तांसाठी खास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 15:20 IST

1 / 7
फ्रेंडशिप डे हा दिवस जगभरातून साजरा केला जातो. मैत्रीचे नाते साजरे करायलाच हवे. इतर नात्यांसाठी दिवस असतात मात्र मित्रमैत्रींना ते आपल्यासाठी किती खास आहेत, हे सांगायला निमित्त काही मिळत नाही. मग असे दिवस साजरे करुन नात्याचा गोडवा वाढवता येतो.
2 / 7
जगभरातून विविध पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारतातही अनेक प्रकारे साजरा केला जातो. शाळेत असताना किंवा कॉलेजात असताना तुम्हीही हे सारे नक्की केले असेल. आत्ताही करु शकता. कारण एखादी गोष्ट साजरी करायला वयाचे बंधन कधीच नसते.
3 / 7
हा दिवस साजरा करायची उत्सुकता शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भरपूर असते. रंगीबेरंगी लेस विकत घेऊन त्या बांधल्या जातात. खास मित्रांसाठी बॅण्ड वापरले जातात. सगळ्यांचे हात भरलेले आणि रंगीबेरंगी दिसतात.
4 / 7
नंतर हळूहळू जसे कॉलेजात जायला लागतात तसे हा दिवस साजरा करायची पद्धत बदलते. बॅण्डची जागा मार्कर घेते आणि पांढर्‍या कपड्यांवर मित्रमैत्रिणींची नावे लिहिली जातात. शाईच उडवली जाते. हार्ट रेघोटले जाते आणि तो शर्ट मुलं अगदी जपून ठेवतात.
5 / 7
कोणताही क्षण साजरा करताना गोड पदार्थांनी केला जातो. तसेच हे नाते साजरे करण्यासाठीही चॉकलेट्स वाटली जातात. विविध प्रकारची चॉकलेट्स एकमेकांना भरवून साथ दिल्याबद्दल थॅक्यू म्हटले जाते.
6 / 7
काही जण या दिवशी जवळच्या मित्रमैत्रीणींसाठी खास गिफ्ट्सही घेतात. कोणताही दिवस साजरा करायची ही एक कॉमन पद्धत आहे. एखाद्याला भेटवस्तू देऊन त्याच्या प्रतीची भावना व्यक्त करणे ही कृती वर्षानुवर्षे केली जात आहे.
7 / 7
आजकाल अनेक कॅफे तसेच हॉटेल, फिरायची ठिकाणे फ्रेंडशिप डेच्या दिवशी विविध ऑफर्स देतात. त्या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारासोबत जाऊन गेम्स खळणे , नाचणे, गाणी म्हणणे आदी गोष्टी केल्या जातात. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार हा दिवस साजरा करत असते.
टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSchoolशाळाcollegeमहाविद्यालय