1 / 11दिवाळीत हमखास प्रत्येक घरोघरी फराळ तयार केला जातो. फराळात आपण शंकरपाळी, चिवडा, करंजी आणि चकली असे अनेक पदार्थ मोठ्या हौसेने करतो. फराळातील हे सगळेच पदार्थ खमंग, खुसखुशीत आणि तोंडाला पाणी आणणारे असले तरी, ते तयार करताना एकच मोठी चिंता असते - ती म्हणजे पदार्थ जास्त तेलकट होणे. जर पदार्थ जास्त तेल शोषून घेत असतील, तर ते चवीला तर बिघडतातच, पण आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात.2 / 11फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करताना ते कुरकुरीत, खुसखुशीत होण्यासोबतच त्यांचा तेलकटपणा देखील कमी व्हावा यासाठी काही खास टिप्स पाहूयात. 3 / 11या काही घरगुती टिप्सच्या मदतीने, फराळाच्या पदार्थांचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. 4 / 11फराळाचे पदार्थ तळण्यासाठी तेल मध्यम ते जास्त गरम (Medium to High Hot) असावे. तेल जर पुरेसे गरम नसेल, तर पदार्थ तेलात टाकल्यावर ते जास्तीचे तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात.5 / 11चकली किंवा शंकरपाळीचे पीठ जास्त सैल भिजवू नका. सैल पीठ जास्त तेल शोषून घेते. पीठ नेहमी घट्ट आणि दाबून मळा.6 / 11कढईत एकावेळी जास्त पदार्थ तळण्यासाठी घालू नका. जास्त पदार्थ एकदम टाकल्यास तेलाचे तापमान लगेच खाली येते, ज्यामुळे पदार्थ तेल शोषून घेतात आणि जास्त तेलकट होतात, नेहमी छोट्या - छोट्या बॅचेसमध्ये पदार्थ तळा.7 / 11 पदार्थ तळले गेल्यावर त्यांना लगेच झाऱ्यामध्ये काढून, कढईच्या कडेवर हलके दाबून त्यातील जास्तीचे तेल काढून घ्या.8 / 11 तळलेले पदार्थ लगेच एका टिश्यू पेपरवर काढून ठेवा. यामुळे शिल्लक राहिलेले तेल शोषले जाते. टिश्यू पेपर थोड्या - थोड्या वेळाने बदलत रहा. 9 / 11गरम पदार्थ एकावर एक रचून ठेवू नका. अशा पद्धतीत पदार्थ वाफेमुळे मऊ पडतात आणि तेलकट होऊ शकतात. ते थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा.10 / 11एखादा फराळाचा पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा चुकूनही वापरु नका. जास्त वेळा वापरलेलं तेल जर वारंवार वापरले तर पदार्थ अधिक जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. 11 / 11पदार्थ तळताना आपण गरम तेलात चमचाभर कॉर्न फ्लॉवर, मीठ घालू शकता. यासोबतच २ ते ३ टुथपिकच्या काड्या देखील गरम तेलात घालून पदार्थ तळून घ्यावेत. यामुळे पदार्थ जास्तीचे तेल न पिता, अजिबात तेलकट होत नाहीत.