शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरीर थंड आणि हायड्रेट ठेवायचं असेल तर चुकूनही खाऊ-पिऊ नका 'या' गोष्टी, पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:09 IST

1 / 7
Foods Avoid In Summer : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत वरच वर वाढत चाललाय हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. बाहेर तर बाहेर घरातही उकाडा इतका जाणवत आहे की, कुलर, फॅनही काम करत नाहीयेत. भरपूर पाणी, ताक, नारळाचं पाणी किंवा आंब्याचं पन्ह प्याल तर शरीराची लाहीलाही होते. यात भर पडते रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थ आणि पेयांची. हे पदार्थ आणि पेय टाळणं या दिवसांमध्ये खूप गरजेचं असतं. कारण यांमुळे शरीरात उष्णता जास्त वाढते. जी तुम्हाला जास्त महागात पडू शकते. त्यामुळे या दिवसात काय टाळावं हे आज जाणून घेऊया. जेणेकरून उन्हाळ्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील.
2 / 7
सध्या सगळीकडे सूर्य भयानक आग ओकतोय. यादरम्यान कलिंगड, लिंबू पाणी, लस्सी यांसारखी थंड पेय जास्त प्यायली जातात. या पेयांनी शरीराला थंडावा मिळतो. पण काही असे पदार्थ किंवा पेय आहेत जे या दिवसात टाळले पाहिजेत.
3 / 7
कॉफी चहापेक्षा आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पण जर तुम्हाला उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळायची असेल तर कॉफी पिणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असतं. कॉफी शरीराला डिहायड्रेट करते. कॉफीमुळे शरीराचं तापमान वाढतं. तसेच याने पचन तंत्रही बिघडतं.
4 / 7
आंबट-तिखट-गोड लोणचं जेवणासोबत खाणं बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लोणच्यामध्ये सोडिअमचं प्रमाण फार जास्त असतं. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. त्यासोबतच उन्हाळ्यात जास्त लोणचं खाल्ल्यानं अपचनाची समस्या होऊ शकते. कारण ते उष्ण असतं.
5 / 7
उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून वेगवेगळे कोल्ड ड्रिंक किंवा सोडा अधिक प्यायला जातो. हे ड्रिंक पिण्यात मजाही येते. पण ते अनहेल्दी असतात. सोड्यामध्ये शुगर आणि इतर अनहेल्दी पदार्थ असतात. जे शरीराला डिहायड्रेट करतात. तसेच गोड पेय प्यायल्याने डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोकाही असतो.
6 / 7
फळांचा ज्यूस प्यायल्यानं मेंदू आणि शरीर फ्रेश राहतं. पण तुम्ही उन्हाळ्यात फक्त ज्यूसचं पिऊ नये. कारण यात फायबर नसतं. तुम्ही ज्यूससोबत फळं आणि भाज्याही खाव्यात. यातून शरीराला अधिक पोषक तत्व मिळतात आणि पोटही बराच वेळ भरलेलं राहतं.
7 / 7
दारू पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. हे सगळ्यांनाच माहीत आहे. बरेच लोक थंड आहे म्हणून उन्हाळ्यात बीअर अधिक पितात. पण उन्हाळ्यात मद्यसेवन केल्यावर डोकेदुखी, तोंड कोरडं पडणे अशी लक्षणं दिसतात. त्याशिवाय दारूचं प्यायल्यावर शरीर गरम राहतं. शरीरात घाम वाढतो. घाम आल्यावर डिहायड्रेशनची समस्या अधिक वाढते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स