1 / 7सध्या वाढत चाललेल्या काही शारीरिक समस्यांपैकी एक म्हणजे मधुमेह.डायबिटीसचा त्रास अनेकांना असतो. साखर खाणे बंद करणे हा एकच उपाय त्यावर असू शकत नाही. त्यासाठी इतरही काही कृती करणे गरजेचे आहे. 2 / 7आजकाल तरुण मुला-मुलींनाही मधुमेहाचा त्रास होतो. कारणे अनेक आहेत. त्यासाठी उपाय करणे मात्र गरजेचे असते. योग्य वेळी उपाय केले तर रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण आटोक्यात आणता येते. त्यासाठी पदार्थांचा आहारात समावेश करा. 3 / 7रोज रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर ब्लड शुगर नियंत्रित राहते. मेथीचे दाणे आहारात असणे नक्कीचे फायद्याचे ठरेल. 4 / 7जांभळाचा गर आणि जांभळाची बी सुद्धा मधुमेहावर फायद्याची ठरते. जांभळाच्या बियांची पूड बाजारात मिळते. त्यावर खास डायबिटीससाठी असेही लिहिलेले असते. जांभळाचे फळ खावे. 5 / 7गाजर खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. त्याच प्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी गाजर खाणे फायद्याचे ठरते. 6 / 7लसणाच्या पाकळ्या खाणे उपयुक्त ठरेल. आहारात लसणाचा समावेश असावा. फोडणी, चटणी, आमटी, डाळ, भाजी आदी पदार्थांमध्ये लसणाच्या पाकळ्या घालाव्यात.7 / 7कडधान्ये आहारात असणे आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्यामुळे रोजच्या जेवणात कडधान्ये असायला हवी. मात्र कडधान्ये फक्त शक्तीवर्धक नसतात तर त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते.