1 / 8प्रत्येकीची त्वचा वेगळी असते आणि म्हणूनच तिची काळजी घेण्याची पद्धतही वेगळी असायला हवी. अनेकदा आपण मैत्रिणीने केले किंवा पार्लरमध्ये स्वस्त आहे म्हणून कोणतेही फेशियल निवडतो, पण ते आपल्या (facial according to skin type) त्वचेला सुट होईलच असे नाही. चुकीचे फेशियल केल्याने चेहऱ्यावर रॅशेस किंवा पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून योग्य फेशियलची निवड करणे अत्यंत गरजेचे असते. 2 / 8प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते आणि त्यामुळे तिच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. काहींची त्वचा तेलकट असते, तर काहींची कोरडी, संवेदनशील किंवा मिश्र प्रकाराची असते. अनेकदा आपण इतरांना सूट होणारे फेशियलच (types of facial for different skin types) स्वतःसाठी करतो, पण हे अगदी चुकीचे असते. त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार योग्य फेशियल निवडणे खूप महत्त्वाचे ठरते.3 / 8त्वचेचा प्रकार ओळखून योग्य फेशियल केल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते, नॅचरल ग्लो वाढतो आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार कोणते फेशियल करणे सर्वात फायदेशीर ठरते ते पाहूयात. 4 / 8जर त्वचा कोरडी आणि खूपच ड्राय असेल तर क्रीम बेस्ड फेशियल, मिल्क किंवा हायड्रेटिंग फेशियल व गोल्ड फेशियलची निवड करावी. सोबतच, आपण हनी फेशियल, बनाना फेशियल, चॉकलेट फेशियल किंवा शीट मास्क फेशियल करणे फायदेशीर ठरेल. 5 / 8 जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करणार आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणार फेशियल करणे फायदेशीर ठरेल. ऑयली त्वचेसाठी क्ले, चारकोल किंवा पर्ल फेशियल करणे फायद्याचे ठरु शकते. हे फेशियल अतिरिक्त तेल नियंत्रित करून पोर्स स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.6 / 8 सेंसेटिव्ह त्वचेसाठी हर्बल फेशियल, फ्रुट फेशियल, कॅलामाईन फेशियल, अॅलोवेरा फेशियल किंवा फ्रूट फेशियल करणे फायदेशीर ठरते. या प्रकारच्या फेशियलमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज किंवा लालसरपणा येत नाही. 7 / 8जर तुमचा चेहरा काही ठिकाणी तेलकट आणि काही ठिकाणी कोरडा असेल, तर अँटी-ऑक्सिडंट फेशियल करावे. हे फेशियल त्वचेचा तेलकटपणा संतुलित करते आणि कोरड्या भागाला हायड्रेट करते. ऑर्गन ऑईल फेशियल, पपई फेशियल, मल्टी व्हिटॅमिन फेशियल, ऑक्सिजन फेशियल यांसारखे फेशियल त्वचेतील तेल आणि मॉइश्चर यांचा समतोल राखण्यास मदत करते.8 / 8जर तुमची त्वचा उन्हामुळे काळी पडली असेल किंवा टॅन झाली असेल, तर डी-टॅन फेशियल (De-Tan Facial) किंवा फ्रूट फेशियल हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे फेशियल त्वचेवरील काळेपणा दूर करून नैसर्गिक रंग परत मिळवण्यास मदत करते. यासोबतच, पपई फेशियल, केसर फेशियल आणि वाईन फेशियल, डायमंड फेशियल, व्हिटॅमिन सी फेशियल करणे उपयुक्त ठरु शकते. याप्रकारचे फेशियल त्वचेला ब्राइटनेस देऊन नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत करतात.