1 / 8कॅन्सरसारख्या आजारावर आता अनेक औषधोपचार आहेत. आपल्या आजुबाजुला आपण असे कित्येक लोक पाहातो जे कॅन्सरमधून पुर्णपणे बरे झाले आहेत. पण तरीही अजूनही कॅन्सरची भीती वाटतेच..2 / 8आपल्याला या आजाराने गाठू नये असं हमखास प्रत्येकाला कधी ना कधी वाटतंच.. काही लोकांच्या मनात तर सतत कॅन्सरची भीती असते. पण नुसती अशी भीती वाटून उपयोग नाही. तुम्हाला जर खरंच त्या आजाराने गाठू नये असं वाटत असेल तर कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टी रोजच्या रोज करायलाच पाहिजेत असं डॉ. अंशुमन कुमार यांनी न्यूज१८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे3 / 8त्यामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका बराच कमी होऊ शकतो. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे MMMS. म्हणजेच Meal, Movement, Mind आणि Sleep. आपण रोजच्या रोज सकस आहारावर भर दिला पाहिजे. प्रोसेस्ड फूड, जंकफूड, पॅकफूड खाणे टाळले पाहिजे.4 / 8दुसरं म्हणजे दररोज कोणता ना कोणता व्यायाम करून काही ना काही शारिरीक हालचाली केल्याच पाहिजेत.5 / 8मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दररोज पुरेशी झोप घ्या. रात्रीची तुमची झोप पुर्ण व्हायलाच हवी. 6 / 8डॉ. अंशुमन सांगतात की तुमच्या प्रांतात जे पिकतं, जे उगवतं ते सगळे हंगामी धान्यं, फळं खाण्यावर भर द्या. 7 / 8 गोड पदार्थ कमीतकमी खा. त्यातही घरी केलेले गोड पदार्थ खाल्लेले एकवेळ चालेल. पण विकतचे गोड पदार्थ कटाक्षाने टाळावे.8 / 8भरपूर फायबर देणाऱ्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीतजास्त प्रमाणात खाव्या. या काही गोष्टी तुम्ही पाळल्या तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.