1 / 8१. बदामाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल असे तेलाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण या प्रत्येक तेलाची काय खासियत आहे आणि त्याचा नेमका कशासाठी अचूक उपयोग करायचा, याची माहिती खूपच थोड्या लोकांना असते. 2 / 8२. म्हणूनच तर कोणतंही तेल कशासाठीही वापरलं गेलं तर ते आपल्या तब्येतीसाठी, सौंदर्यासाठी तेवढंसं परिणामकारक ठरत नाही. म्हणूनच कोणतं तेल नेमकं कशासाठी वापरायचं, याविषयीची ही खास माहिती प्रत्येकासाठी अगदी उपयोगी ठरणारी आहे. ही माहिती इन्स्टाग्रामच्या thejuhikapoor या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 3 / 8३. बदामाच्या तेलाचा उपयोग सौंदर्यासाठी करायचा, हे बहुतांश जणांना माहिती आहे. हिवाळ्यात त्वचेचा काेरडेपणा घालविण्यासाठी, त्वचा चमकदार बनविण्यासाठी बदामाचं तेल अतिशय उपयुक्त ठरतं.4 / 8४. केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल, केसांची वाढ खूपच कमी झाली असेल तर डोक्याला मोहरीच्या तेलाने मालिश करावी.5 / 8५. उच्च रक्तदाब किंवा मग हृदयविकार असा त्रास असणाऱ्यांनी खाण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरावं.6 / 8६. त्वेचवर ॲक्ने, पुरळं आली असतील, तर ती घालविण्यासाठी नीम ऑईल हा चांगला पर्याय ठरू शकतो.7 / 8७. गुडघेदुखी किंवा हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीसाठी कॅस्टर ऑईल उत्तम आहे.8 / 8८. त्वचा मृदू- मुलायम होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापुर्वी शुद्ध तुपाने मालिश करावी.