शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांसाठी डॉ. श्रीराम नेने सांगतात खास औषध- म्हातारपणीही गुडघे राहतील दणकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 15:21 IST

1 / 7
कमी वयातच गुडघेदुखीची समस्या असणाऱ्यांचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे (health tips for strong knees). चाळीशी ओलांडल्यानंतर तर बहुतेक जणांना गुडघेदुखीचा त्रास होतोच (how to get rid of knee pain). वाढत्या वयासोबत हा त्रास आणखी वाढत जातो.(Dr. Shriram Nene suggests best exercise to reduce knee pain)
2 / 7
गुडघेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात किंवा गुडघे दुखूच नयेत म्हणून सुरुवातीपासूनच त्यांची कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारी पोस्ट अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी साेशल मीडियावर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये डॉ. नेने सांगतात की जर तुम्हाला तुमचे गुडघे मजबूत ठेवायचे असतील तर स्विमिंग, वॉकिंग, सायकलिंग असे व्यायाम रोज करा. गुडघ्यांवर खूप जोर येईल असे रनिंग, स्क्वॅट्स असे व्यायाम सवय असल्याशिवाय करू नका.
4 / 7
ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना गुडघेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा. तुमचं वजन एक किलोने वाढलं तर त्याच्या चारपट ताण तुमच्या गुडघ्यांवर येणार आहे हे लक्षात ठेवा.
5 / 7
व्यायाम असे निवडा की ज्यामध्ये गुडघ्यांसोबतच पोटऱ्या, मांड्या यांचाही व्यायाम होईल. त्यांचा व्यायाम झाला तरच गुडघ्यांचे स्नायू आणखी बळकट होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही पायांचे वेगवेगळे स्ट्रेचिंग प्रकार निवडू शकता.
6 / 7
बूट, चप्पल हे नेहमी चांगल्या दर्जाचेच हवे. कारण ते तुम्ही चुकीच्या मापाचे, हलक्या दर्जाचे निवडले तर त्यामुळेही गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. बूट एकदम फ्लॅटही नको आणि हिल्स असणारेही नको. त्याला योग्य प्रमाणातच कुशनिंग हवे.
7 / 7
गुडघे कधी दुखावलेच तर त्यांना थाेडा आराम द्या. बर्फाने शेकून काढा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सExerciseव्यायामWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सMadhuri Dixitमाधुरी दिक्षित