शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तोंडाला कायम दुर्गंधी येते? ५ सवयी स्वत:ला लावून घ्या, वास येणार नाही- नेहमीच वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2024 14:35 IST

1 / 6
तोंडाला सतत दुर्गंध येत असेल तर चारचौघांत बोलण्याची खूप लाज वाटते. शिवाय ही बाब तोंडाच्या आरोग्यासाठीही अतिशय हानिकारक आहे. त्यामुळेच तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती घालविण्यासाठी या काही गोष्टी नियमितपणे करा...
2 / 6
जे लोक खूप कमी पाणी पितात, त्यांच्या तोंडाला दुर्गंध येतो. त्यामुळे अगदी वेळ ठरवून थोड्या थोड्या वेळाने निययमितपणे पाणी प्या.
3 / 6
रात्री झोपण्यापुर्वी ब्रश करणे अनेक जण टाळतात. असं करू नका. दिवसांतून २ वेळा ब्रश करा. ब्रश करण्यासाठी नेहमी फ्लूरॉईड असणारी टुथपेस्ट वापरा.
4 / 6
ब्रश केल्यानंतर जीभ स्वच्छ करायला विसरू नका.
5 / 6
प्रत्येकवेळी जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरा. जेणेकरून दातांमध्ये अडकलेले अन्न निघून जाईल आणि दुर्गंधी येणार नाही.
6 / 6
दिवसातून एकदा लिंबू सरबत प्या किंवा व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारे संत्री, मोसंबी, किवी असे एखादे फळ खा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स