शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळी रिकाम्या पोटी प्या चमचाभर नारळाचे तेल, ५ आजारांपासून कायम राहाल दूर- राहाल फिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2025 18:44 IST

1 / 7
नारळाचे तेल जितके त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तितकेच आहारात त्याचा वापर करणे देखील चांगले मानले जाते. (coconut oil health benefits)
2 / 7
नारळाच्या तेलात जीवनसत्त्व, खनिजे, निरोगी चरही आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक आढळते. सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर नारळाचे तेल प्यायल्याने शरीराला कसा फायदा होतो जाणून घेऊया. (daily health tips without medicine)
3 / 7
रिकाम्या पोटी नारळाचे तेल प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे दिवसभर आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवणार नाही.
4 / 7
पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी नारळाचे तेल प्या.
5 / 7
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर नारळाचे तेल प्या. यामुळे शरीरातील चयापचय सुधारते. आणि शरीरातील चरबी हळूहळू वितळून वजन कमी होते.
6 / 7
शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करण्यासाठी नारळाचे तेल प्या.
7 / 7
नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट्स, अँटी- व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स