म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7मुलांना कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. कारण त्यांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्या तुलनेत मात्र त्यांच्या आहारातून डोळ्यांसाठी पोषक पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. 2 / 7 स्क्रिन टाईम वाढल्यामुळे हल्ली डोळ्यांच्या समस्या लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच वाढल्या आहेत. म्हणूनच असे काही पदार्थ आहेत जे आपण डोळ्याचं आरोग्य आणि नजर उत्तम राहण्यासाठी नियमितपणे खाल्ले पाहिजेत. 3 / 7त्यापैकी पहिले आहे व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात देणारे पदार्थ. यामध्ये तुम्ही ब्रोकोली, गाजर, पपई खाऊ शकता. 4 / 7 डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी अशी बेरी प्रकारातली फळंही उत्तम आहेत. 5 / 7अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमेगा ३ देणारे चिया सीड्स, जवस, अक्रोड यासारखे पदार्थही डोळ्यांसाठी उत्तम असतात, 6 / 7तसेच सुर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, अव्हाकॅडो, लाल सिमला मिरची हे पदार्थही डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. 7 / 7डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी झिंकयुक्त पदार्थही भरपूर प्रमाणात खावे. यामध्ये तुम्ही हरभरे, डाळी, भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, चीज, दूध असे पदार्थ खाऊ शकता.