शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५०० रुपयांत घराला द्या लक्झरी लूक, 'हा' सोपा उपाय करा- घरात वाटेल फ्रेश, प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 14:57 IST

1 / 8
छोट्या छोट्या रोपांचा थोडा क्रियेटीव्ह पद्धतीने वापर केला तर अगदी लहान, साध्या घरालाही खूप छान लूक देता येतो. रोपांचं सौंदर्य तुमच्या घराचं सौंदर्य खुलविण्यासाठीही नक्कीच मदत करतं.
2 / 8
म्हणूनच आता अशी काही रोपं पाहूया जी तुमच्या घराला छान लूक देण्यासाठी मदत करतील. ही रोपं तुम्ही घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवून पाहा. तुमचं जुनंच घर तुम्हाला एकदम नव, प्रसन्न आणि फ्रेश वाटू लागेल.
3 / 8
एरिका पाम घरात नक्की ठेवा. घराच्या व्हरांड्यामध्ये, एखाद्या कॉर्नरला किंवा जिन्यामध्ये तुम्ही एरिका पाम ठेवू शकत. हे रोप घरातील दुषित हवा शोषून घेण्यासाठी मदत करतं.
4 / 8
स्नेक प्लांट देखील तुम्ही घरात एखाद्या कॉर्नरला ठेवू शकता. किंवा हे राेप बेडरुममध्ये ठेवायलाही छान आहे. रात्रीच्या वेळी हे रोप जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडतं.
5 / 8
स्पायडर प्लांटही तुमच्या घराला खूप छान लूक देतं. अगदी बैठकीतल्या टिपॉयपासून ते बाथरुमपर्यंत कुठेही तुम्ही ते ठेवू शकता. हे रोप खूप छान डेरेदार होत पसरत जातं.
6 / 8
छोटे छोटे मनीप्लांटही तुम्ही घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. त्यामुळेही घरातली हवा शुद्ध राहण्यास मदत होते.
7 / 8
पीस लीली हे असंच एक सुंदर रोप. याला येणारी पांढरी फुलं पाहताच मन प्रसन्न होतं. २ ते ३ दिवसांतून एकदा त्याला थोडं पाणी द्यावं लागतं..
8 / 8
ही सगळी रोपं ठेवण्यासाठी थोडे पैसे खर्च करून आकर्षक कुंड्या मात्र नक्की घ्या. त्यामुळे तुमचं घर आणखी जास्त एलिव्हेट दिसेल.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणीHomeसुंदर गृहनियोजनHome Decorationगृह सजावट