शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरच्या घरी करा ‘हे’ सोपे एक्सरसाईज पटापट, गुडघेदुखीची समस्या दूर होईल झटपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:55 IST

1 / 7
गुडघेदुखीची समस्या आजकाल केवळ वयोवृद्धांना नाही तर कमी वयातील महिलांनाही होते. दिवसभरातील कामं, उठ-बस, धावपळ करून अनेक महिला गुडघेदुखीच्या समस्येनं वैतागलेल्या असतात. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून छोटा-मोठा उपाय करतात. अशात गुडघेदुखीची समस्या नेहमीसाठी कशी दूर करायची याबाबत आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
2 / 7
ही एक्सरसाईज जिममध्येही करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या एक्सरसाईजनं पायांच्या आणि गुडघ्यांच्या नसा खुलतात. तसेच मांसपेशींना आराम मिळतो. एखादी नस दबली असेल तर त्यात तणाव निर्माण होतो. हा तणाव या एक्सरसाईजनं दूर केला जाऊ शकतो. ही एक्सरसाईज तुम्ही रोज १० ते १५मिनिटे करू शकता.
3 / 7
ही एक्सरसाईज करण्यासाठी एक खुर्ची घ्या आणि त्यानंतर खुर्ची पकडून पाय मागच्या बाजूने फोल्ड करा. सरळ उभे राहून पाय जेवढा वर नेता येईल तेवढा वर करा. अशाचप्रकारची एक्सरसाईज दुसऱ्या पायाने करा. ही एक्सरसाईज कराल तुमचा दिवसभराचा थकवा लगेच दूर होईल.
4 / 7
ही एक्सरसाईज फार सहजपणे केली जाऊ शकते. यात एका खुर्चीवर हात टेकवून शरीर समोरच्या दिशेनं वाकवा. आता याच स्थितीत गुडघे वाकवून डिप्स मारण्याचा प्रयत्न करा. याने संपूर्ण शरीरासोबतच मांड्यांच्या आजूबाजूच्या मांसपेशी सक्रिय होतात. तसेच याने गुडघ्यांची समस्याही दूर होते. मात्र, वयोवृद्ध लोकांनी ही एक्सरसाईज करू नये. तसेत ज्यांच्या हाताला काही इजा झाली असेल तर त्यांनीही करू नये.
5 / 7
ही एक्सरसाईज करण्यासाठी एक छोटा टेबल किंवा उंच वस्तू लागेल. यात एक पाय ९० डिग्रीपर्यंत उचला आणि त्यावर ठेवा. यावेळी शरीर थोडं खाली झुकवा. नंतर दुसरी प्रक्रिया सुद्धा अशीच करा. म्हणजे एक पाय वर एक पाय खाली असं. यानं गुडघ्यांची चांगली मालिश होईल आणि गुडघे चांगल्याप्रकारे काम करतील.
6 / 7
टॉवेलच्या छोट्या लोडला गुडघ्यांच्या खाली घ्या. टाचांना जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यांच्या खालचा टॉवेल पूर्ण दाबण्याचा प्रयत्न करा. यामुळे स्ट्रेस स्क्वॅड्स टाइट होतात. हा प्रयोग १० ते १५ रिपिटेशन्सने केल्यास फायदा होईल.
7 / 7
आता ब्रिस्कवॉक म्हणजे दुसरं तिसरं वेगळं काही नसून वेगानं चालण्याचा एक भाग आहे. जॉगिंग आणि चालणे यांच्यामधली ही गती असते. ब्रिस्कवॉकमध्ये साधारणत: १२ मिनिटांमध्ये एक किलोमीटर अशा गतीने चालणे अपेक्षित असते.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायाम