1 / 9चिंचपेटी हा अस्सल मराठी दागिना लग्नकार्यात हमखास घातला जातो. त्यामध्ये आता अनेक नवनविन डिझाईन्स आलेले आहेत.2 / 9तुम्हालाही लग्नसराईच्या निमित्ताने चिंचपेटीची खरेदी करायची असेल तर हे काही डिझाईन्स पाहून घ्या..3 / 9अशा पद्धतीचा मोत्यांचा वेल लावलेल्या चिंचपेटी गळ्यातल्यांना सध्या खूप मागणी आहे. कारण हा प्रकार अतिशय वेगळा आहे.4 / 9ज्यांना गळ्यात खूप भरगच्च दागिना आवडत नाही त्या अशी तीन पेट्या असणारी नाजूक चिंचपेटी घेतात.5 / 9चिंचपेटीचा आणखी एक नवा प्रकार. यामध्ये मोत्यांऐवजी गोल्डन रंगाचा जास्त वापर करण्यात आला आहे.6 / 9खूप हेवी, भरगच्च दागिना आवडत असेल तर या प्रकारची चिंचपेटी तुम्हाला आवडू शकते.7 / 9पुर्वी चिंचपेटी फक्त मोत्याचीच असायची आणि तिच्यामध्ये काही प्रमाणात स्टोनवर्क असायचे. पण आता मात्र अशा पद्धतीच्या स्टोन वर्क चिंचपेट्यांची मागणी वाढली आहे.8 / 9मोती, स्टोन यासोबतच गोल्डन रंगातल्या चिंचपेटींनाही सध्या खूप मागणी आहे.9 / 9चिंचपेटी प्रकारातलं हे आणखी एक वेगळं आणि सहसा कुणाकडे न दिसणारं हे एक डिझाईन पाहा. या चिंचपेट्या तुम्ही सोन्यामध्येही करून घेऊ शकता किंवा मग तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधून तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.