शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    निळ्या काठांची पांढरी साडी; फॅशनपलिकडे जाणारं सन्मानाचं-आदराचं प्रतीक! निवडा साधेपणातलं सामर्थ्य

    By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:52 IST

    1 / 8
    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2026) म्हणजेच १४ एप्रिल. त्यादिवशी बाबासाहेबांना वंदन करण्याच्या कार्यक्रमासाठी निळ्या काठांची पांढरी साडी तरुणी-महिला नेसतात. मोठ्या मायेनं एकमेकींसाठीही साड्या घेतल्या जातात. (Bhim Jayanti Special White And Blue Saree)
    2 / 8
    पांढरा रंग हा पावित्र्य, शांतता, समानता आणि औदार्याचं प्रतीक. निळा रंगही अथांगतेची महती सांगतो. (Ambedkar Jayanti 2026)
    3 / 8
    त्या रंगाची साडी मनालाही प्रसन्नता देते आणि जाणीवही करुन देते महिलांना मिळालेल्या हक्क आणि अधिकारांची. (White And Blue Saree For Bhim Jayanti)
    4 / 8
    कॉटन किंवा लिननची सुती साडी, सिल्क किंवा पैठणीच्या प्रकारतही पांढरी साडी आणि निळी बॉर्डर असे सुंदर पर्याय आता उपलब्ध आहेत.
    5 / 8
    उन्हाळ्यात कॉटन, लिनन किंवा खादीच्या साड्या जास्त सोयीच्या. दिसतातही अगदी साध्या पण एलिगंट. साधेपणातलं समानततेचं हे रुप दिसतंही सुंदर.
    6 / 8
    अर्थात साडी, पोषाख हे प्रतीक झालं. त्यापलिकडे सन्मानानं जगण्याची लढाई आणि लोकशाहीतली आपली कर्तव्यही साऱ्यांसाठी महत्वाची आहेत.
    7 / 8
    बॉर्डरसाठी तुम्ही रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू किंवा स्काय ब्लू अशा आवडीच्या शेड्स निवडू शकता. सध्या इंडीगो प्रिंट असेल्या निळ्या बॉर्डरची खूप फॅशन आहे
    8 / 8
    शिक्षण-संघर्ष-न्याय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं ही शिकवण आपण कधीही विसरता कामा नये. महिलांसाठी तर ती लाखमोलाची!
    टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीfashionफॅशनIndian Festivalsभारतीय उत्सव-सणsaree drapingसाडी नेसणेdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर