शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आलिया-रणबीरच्या घरी लेकीचे आगमन! दोघांची प्यारवाली लव्हस्टोरी - रोमँटिक देखणी केमिस्ट्री - पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 14:54 IST

1 / 7
गेल्या काही महिन्यांपासून बी टाऊनमध्ये आलियाच्या प्रेग्नन्सीमुळे ती आणि रणबीर बरेच चर्चेत आहेत. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून या दोघांनी आज गोड परीला जन्म दिला आहे (Alia bhat Ranbir kapoor Welcomes baby Girl).
2 / 7
आलिया भट तिची प्रेग्नन्सी जाहीर झाल्यापासून तिची फॅशन, प्रेग्नन्सीतही ती करत असलेले काम, प्रेग्नन्सीबाबची तिची स्टेटमेंटस अशा वेगवेगळ्या गोष्टींवरुन चर्चेत होती. तर रणबीरही बाबा होणार असल्याने चर्चेत होता.
3 / 7
कपूर कुटुंबिय आलिया आणि रणबीरच्या बाळाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते आणि आज आलियाने या लहानग्या परीला जन्म दिल्याने कपूर आणि भट कुटुंबियांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
4 / 7
आलियाला डिसेंबरमधील तारीख देण्यात आली होती. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तिने या गोड परीला जन्म दिला आहे. मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाने आपल्या बाळाला जन्म दिला असून आज सकाळी ७ वाजता ती रुग्णालयात दाखल झाली.
5 / 7
आलियाची प्रसूती सी सेक्शन पद्धतीने झाली असल्याचे मीडिया रिपोर्टसमध्ये सांगण्यात आले आहे. दोघींची तब्येत चांगली असल्याचे म्हटले जात आहे.
6 / 7
काही दिवसांपूर्वीच आलियाचे डोहाळजेवण पार पडले होते. त्यावेळी तिच्या आणि रणबीरच्या कुटुंबातील व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत होती. या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
7 / 7
आलिया आणि रणबीर आलियाच्या प्रेग्नन्सीवरुन बरेच चर्चेत होते. कारण लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांनी गुड न्यूज शेअर केली होती. त्यामुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचे बोलले जात होते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAlia Bhatआलिया भटPregnancyप्रेग्नंसी