1 / 6अधिक महिन्यात महिला आवर्जून जोडवी खरेदी करतात (Adhik Maas 2026). जोडव्यांचे वेगवेगळे डिझाईन्स तर आपल्याला माहितीच आहेत. जोडवे पायाच्या अंगठ्याच्या बाजुच्या बोटात घालतात. पण या व्यतिरिक्त पायाच्या इतर बोटांमध्येही दागिने घालतात. ते नेमके कोणते ते पाहा आणि अधिक मासानिमित्त हवं तर खरेदी करून टाका...(different types of traditional toe rings)2 / 6पायच्या अंगठ्यात जे घालतात त्याला अंगुठे म्हणतात. हल्ली आपल्याकडे चांदीऐवजी तांब्याची रिंग अंगठ्यात घातली जाते. शरीरातली उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते असं म्हणतात.(types of traditional toe rings)3 / 6यानंतर अंगठ्याच्या बाजुच्या बोटात असणारी जोडवी तर आपल्याला माहितीच आहे आणि बहुतांश महिला रोजच जोडवी घालतात. 4 / 6मधल्या बोटानंतर येणाऱ्या बोटात जो जोडवी प्रकार घातला जातो त्याला बिछुवे असं म्हणतात. आपल्याकडे नववधूला जोडवी आणि बिछुवे किंवा बिछवे असं दोन्ही घातलं जातं.5 / 6त्यानंतर येणाऱ्या बोटामध्ये मासोळ्या घातल्या जातात. नावावरूनच लक्षात येतं की त्याचा आकार अगदी मासोळ्यांसारखाच असतो. नाजुक आकाराचे, ठसठशीत असे कित्येक डिझाईन्स त्यात मिळतात.6 / 6त्यानंतर येणाऱ्या बोटामध्ये मासोळ्या घातल्या जातात. नावावरूनच लक्षात येतं की त्याचा आकार अगदी मासोळ्यांसारखाच असतो. नाजुक आकाराचे, ठसठशीत असे कित्येक डिझाईन्स त्यात मिळतात.