शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आमिर खान सांगतो, ‘प्यारवाली केमिस्ट्री!’ कुठलंही नातं निभावताना नेमकं चुकतं काय आणि प्रेमात बिनसतं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 16:51 IST

1 / 9
आमिर खान हा बॉलिवूडमधील एक अत्यंत नावाजलेला कलाकार आहे. तो त्याच्या रोमांटिक भूमिकांसाठीही ओळखला जातो. आमिर खानची प्रेमाबद्दलची वैयक्तिक भूमिका अगदी स्पष्ट आहे.
2 / 9
आमिर खानचा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. त्याने सांगितले की तो फार रोमांटिक आहे. आजच्या जगातही निखळ प्रेम आहे, असे तो मानतो.
3 / 9
आमिरच्या मते, एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर त्याच्याबरोबरच जीवन व्यतीत करावसं वाटत असेल तर, ती व्यक्ती तुमची जीवन साथी आहे. अशा व्यक्तीचा शोध घेणे म्हणजेच खरे प्रेम.
4 / 9
तुम्ही स्वत:वर प्रेम करत असाल तरच दुसर्‍यावर करू शकाल, असे आमिर म्हणाला. एखाद्याचे मन तेव्हाच जिंकता येते जेव्हा आ पण स्वत:वर विश्वास ठेवतो.
5 / 9
मतभेद असले तरी एकमेकांच्या मतांचा आदर करता आला पाहिजे. एकमेकांबद्दल संवेदनशीलता असायला हवी. तसेच एकमेकांची काळजी घेता यायला हवी.
6 / 9
आमिर खानचा तरुणांसाठी संदेश आहे की, स्वभावाकडे दुर्लक्ष कधीच करू नका. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याचा स्वभाव जाणून घ्या. तो जर प्रेमा योग्य नसेल तर आशेवर राहू नका. माणसांचा मुळ स्वभाव बदलत नाही.
7 / 9
आमिर खान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबरच्या नात्याबद्दलही बोलला. तो म्हणाला, आम्ही जरी वेगळे झालो असलो तरी, मी दोघींचाही फार आदर करतो. किरण व रीना दोघींनीही त्याच्यावर केलेले प्रेम तो विसरलेला नाही.
8 / 9
आमिर खानने तिसरे लग्न करायचा विचार केलेला नाही. मात्र तो सध्या गौरी स्प्रॅट नामक महिलेला डेट करत आहे. त्या दोघांमध्ये २५ वर्षांची मैत्री आहे. गौरी स्प्रॅट हे आमिरचे तिसरे प्रेम आहे. गेली दिड वर्षे ते डेट करत आहेत.
9 / 9
आता ६०व्या वर्षी लग्न करायचा विचार कुठे करणार असं आमिर म्हणाला. पण त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
टॅग्स :Aamir Khanआमिर खानrelationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपKiran Raoकिरण रावIra Khanइरा खान